पुणे : पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठीच्या परिक्षेत चष्म्यामध्ये छुपा कॅमेरा बसवून गैरप्रकार केल्याच समोर आलं आहे. गैरप्रकार करणारे तीन विद्यार्थी, त्यांना साथ देणारे TCS कंपनीचे दोन कर्मचारी आणि एक अज्ञात व्यक्ती अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात (Pune News) आला आहे, मात्र या गैरप्रकारात फक्त तीन विद्यार्थी सहभागी नसुन इतरांचाही सहभाग असल्याचा आरोप परिक्षा देणाऱ्या इतर अभियंत्यांनी केला आहे. पुणे महापालिककडून (Pune News) 169 कनिष्ठ अभियंता पदांसाठी 2024 मध्ये जाहीरात काढण्यात आली होती. मात्र अनेकदा पुढं ढकलण्यात आलेली ही परिक्षा एप्रिल 2026 मध्ये घेण्यात आली. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर या शहरांत 22 एप्रिल, 23 एप्रिल आणि 29 एप्रिलला घेण्यात आली. 169 जागांसाठी या विविध शहरांमधून बावीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली. मात्र परिक्षेनंतर या परिक्षेचा पेपर सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पुणे महापालिकेच्यावतीने ही परिक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या TCS आणि IBPS या कंपन्यांना तक्रार देण्यात आली. (Pune News)

Continues below advertisement

Pune News: चष्म्यामध्ये दडवलेल्या कॅमेराच्या सहाय्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले

IBPS ने या सर्व परिक्षा केंद्रांवरील CCTV फुटेज तपासले असता छत्रपती संभाजी नगरमधील चिकलठाणा परिक्षा केंद्रावरील तीन विद्यार्थ्यांच्या हालचाली परिक्षेच्या काळात संशयास्पद असल्याचं आढळून आलं. या तीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या चष्म्यामध्ये छुपे कॅमेरे बसवले होते. परिक्षा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला या तीन विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका न सोडवता अर्धा तास वेळ काढला. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी चष्म्यामध्ये दडवलेल्या कॅमेराच्या सहाय्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले. त्यानंतर हे विद्यार्थी बाथरुमला जाण्यासाठी म्हणून परिक्षा खोलीच्या बाहेर पडले. बाथरुममध्ये त्यांना मोबाईल मिळाला. त्यावरून त्यांनी ती प्रश्नपत्रिका बाहेर पाठवली. बराच वेळ ते बाथरुममध्येच होते. त्यानंतर तिघांनी परिक्षा हॉलमध्ये येऊन पेपर सोडवला. गजानन पाचे, शिवशंकर शेळगावे आणि विष्णू कांत वाघमारे अशी या तिन विद्यार्थ्यांची नावे आहेत. या तिघांनाही या परिक्षेत 90 पेक्षा अधिक गुण मिळून तिघेही कनिष्ठ अभियंता पदांसाठी निवडले गेले.

Pune News: तीनच विद्यार्थ्यांनी मिळून हा गैरप्रकार केल्याचा दावा

तर या गैरप्रकारात TCS मधील इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा योगेश राठोड आणि पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेला विकास गायकवाड यांनी त्यांना साथ दिल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर या पाचही जणांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गैरप्रकार समोर आल्यानंतर पुणे महापालिकेने संपूर्ण परिक्षा रद्द करण्यास नकार दिला असून फक्त तीनच विद्यार्थ्यांनी मिळून हा गैरप्रकार केल्याचा दावा केला आहे, तर या गैरप्रकारात अनेकांचा सहभाग असल्याचा दावा करत शंभरहून अधिक अभियंत्यांनी केला आहे. पुणे पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी छत्रपती संभाजी नगर, लातूर, हिंगोली आणि जालना अशी चार पथके तयार केली आहेत.

Continues below advertisement

Pune News: अतिरिक्त आयुक्त, प्रजित नायर यांनी दिली माहिती

पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, प्रजित नायर, यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, पुणे महापालिकेच्या स्थापत्य अभियंता परीक्षेत फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 5 जणांवरून गुन्हा दाखल यामध्ये तीन परीक्षा उमेदवार आणि दोन कर्मचारी जे टीसीएसमधील परमनंट कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिखलठाणा या केंद्रावर हा प्रकार घडला आहे. पुणे महापालिकेच्या वतीने आयबीपीएसच्या 22,23 ,29,30 जून 2026 परिक्षा झाल्या, एक व्हिडिओ टेलिग्राम व्हिडीओ फिरत होता, याची आम्ही तपासणी करा अशी मागणी होत होती. 545 जे लोक आहेत त्याची तपासणी केली, आयबीपीएसने तपास करून रिपोर्ट दिला. 545 लोकाचे लाँग अनलाईज केले, यातील तिघे लोक बाथरूम मध्ये गेले, त्यानंतर ते परत आले, त्यात प्रश्न मोडसबद्दल आयबीपीएसने सांगितले आहे. बाथरूममध्ये मोबाईल मिळाला आहे. डोळ्यात कॅमेरा ठेवून ते केलं असावं असं आम्हाला वाटतं आहे. शेवटच्या अर्ध्या तासात पेपर सोडवला असल्याची माहिती आहे, असंही आयुक्त म्हणालेत.

Sachin Padwal: सचिन पडवळांनी एआय गॅजेट्स गॉगल्स व चष्म्यांवर नियंत्रणाची केलेली मागणी

“मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील कार्यालये, विभागीय कार्यालये तसेच महत्त्वाच्या आस्थापनांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्मार्ट गॅजेट्स गॉगल आणि चष्म्यांच्या वापरामुळे नागरिकांच्या गोपनीयतेस तसेच शासकीय सुरक्षेस संभाव्य धोका निर्माण झाला आहे. सदर उपकरणांमध्ये छुप्या पद्धतीने छायाचित्रण (फोटो काढणे), ध्वनिमुद्रण, व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग करणे शक्य असल्याने संवेदनशील माहितीची चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही एआय गॅजेट्स गॉगल्स व चष्म्यांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करुन त्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. मंत्रालय, पोलीस ठाणे आणि न्यायालय परिसर यांसारख्या संवेदनशील ठिकाणांप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय, विभागीय कार्यालये आणि इतर महत्त्वाच्या आस्थापनांमध्येही अशा उपकरणांच्या गैरवापरामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो; ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महानगरपालिकेचे असे ठाम मत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व कार्यालये, मुख्यालय, विभागीय कार्यालये तसेच महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व महत्त्वाच्या आस्थापनांच्या आवारात कृत्रिम बुद्धीमता (AI) आधारित गॅजेट्स गॉगल आणि स्मार्ट चष्म्यांच्या वापरावर तातडीने व पूर्णपणे निर्बंध घालण्यात यावेत. तसेच, सदर निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर योग्य सूचना फलक लावून सुरक्षा यंत्रणेस आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी देखील सचिन पडवळांनी केली आहे.