मोशी दुर्घटना! इमारतीतून 8 मृतदेह बाहेर काढण्यात यश, एक व्यक्ती बाहेरच्या कचऱ्याखाली, शोधकार्य सुरु
पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरातील महापालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड मोठा ढिगारा घसरुन प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली आहे.
Pune Moshi Building Collapse : पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरातील महापालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड मोठा ढिगारा घसरुन प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. ही घटना बुधवारी घडली होती. दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते. यातील 14 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृतदेह बाहेर काढण्यात यळ आलं आहे. मात्र एक व्यक्ती बाहेरच्या कचऱ्याखाली दबला गेलाय. त्याचा शोध सुरु आहे.
मोशी दुर्घटनाग्रस्त इमारतीतून 8 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. इमारतीतील रेस्क्यू ऑपरेशन संपलं आहे. मात्र एक व्यक्ती बाहेरच्या कचऱ्याखाली दबला आहे. त्याचा शोध सुरु असल्याची माहिती पालिका आयुक्त विजय सुर्यवंशींनी दिली आहे.
नेमकं काय घडलं? (Pune Moshi Building Collapse)
पुण्यातील मोशी परिसरातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. मोशीतील ही दुर्घटना बुधवार, 8 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता घडली. मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोमधील 'लेगसी वेस्ट'चा प्रचंड ढिगारा घसरून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले आणि त्यानंतर NDRF, अग्निशमन दल व इतर यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले.
या दुर्घटनेत इमारतीचा मोठा भाग कोसळून अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. सुरुवातीला अनेक जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र काही कर्मचारी अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बचावकार्यासाठी NDRF, अग्निशमन दल, लष्कर आणि इतर आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून विषारी वायू, अस्थिर इमारत आणि सततचा पाऊस यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेनंतर कचरा व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासकीय निष्काळजीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
Moshi Building Collapse: घटना घडण्याच्या दोन दिवस संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार दिली, उपाययोजना का केली नाही?
तुम्ही आमच्याबरोबर चला, आमच्या नातेवाईकांना दिलासा द्या. या इमारतीला भेगा पडल्या होत्या. आम्ही ते फोटो घटना घडण्याच्या आधी दोन दिवस संबंधित अधिकाऱ्यांना पाठवल्या होत्या. त्यावर का उपाययोजना करण्यात आल्या नाही. आज ज्या पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे, त्या पद्धतीने दोन दिवस काम झालं नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. कचऱ्याचा ढीग किती उंचीपर्यंत असावा, याची काही एसओपी असेल ना? चुकीचं कोणी उल्लंघन करत असेल तर त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे ना, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अशी मागणी ही नातेवाईकांनी केली आहे.
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?






















