बीड: बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात केली, या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली जात आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित आहे. त्याचबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनावणे, मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित आहेत, मात्र, पुण्यातील आमदार, खासदार या मोर्चासाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी हल्लाबोल केला आहे.


नेमकं काय म्हणाले सुरेश धस?


या मोर्चाला संबोधित करताना आमदार सुरेश धस यांनी पुण्यातील आमदार खासदारांना टोला लगावला आहे. पुण्यातल्या आमदारांना रविवारची सुट्टी असते म्हणून त्यांना इथे यायला सवड मिळाली नसेल, असं ते म्हणालेत. पुणे भूमी ही पावन भूमी आहे, पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जायचं. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराची संजीवन समाधी इथेच आहे, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे महात्मा ज्योतिबा फुले, या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद, लोकमान्य टिळक अगदी अलीकडे म्हणलं तर पु.ल.देशपांडे, महर्षी कर्वे, या सर्व विभूतींनी त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली ही पुणे भूमी आहे. शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि आता 21, 22 आणि 23 वर्षाच्या लेकरांना वालू बाबा हे आता मुलांना संस्कार देताय दुसऱ्याच्या लेकराला मारायचे, दुसऱ्याच्या लेकरावरती हल्ले करायचे, स्वतःचे तोंमडी भरण्यासाठी हे कोणाचंही मुंडक कापायला अजिबात मागे पुढे पाहायला ना पहा अशा प्रकारची नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालू बाबा यांनी केलेले आहे, असं म्हणत त्यांनी वाल्मिक कराडला लक्ष केलं आहे. 


वालू बाबांचे आणि ह्या त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही. हे नम्रपणे या ठिकाणी शाहिस्तेखानाची बोटं जिथं कापली, त्या लाल महालापासून आपण मोर्चाला सुरुवात केली. आमचा निर्णय एकच आहे की शाहिस्तेखानाची बोटं महाराजांनी इथं कापली आणि या पुण्यामध्ये पवित्र न्यायदानाचे काम केलं. ज्याची आज सुद्धा चर्चा होती. या लहान मुलांचं ज्यांनी हरपून घेतलंय त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे, हे आमचे सगळ्यांचे मागणे आहे, असंही पुढे सुरेश धस म्हणाले आहेत.


बघून पंढरी शेठ फडके यांचं गाणं आठवतं


 या प्रकाराकडे बघून पंढरी शेठ फडके यांचं गाणं आठवतं, दहा नंबरचा सरकार असं दहा नंबरच सरकार म्हणतो, भेटेल जेव्हा गुन्ह्यात, तेव्हा मला अटक करा पुण्यात. यांचे सगळे आरोपी पुण्यात अटक झाले... वालुकाका अँड गँग्स ऑफ परळी यांच्यामुळे पुण्याचं नाव खराब होईल. यांचे जिथे-जिथे पुण्यात फ्लॅट्स असतील, पुण्यातला जनतेला विनंती करतो. यांची प्रॉपर्टी दिसेल ती फक्त कळवा, वालू काका इथे आला शंभर अकाउंट सापडले आहेत, यांचे जे अकाउंट सापडले आहेत त्यांची ईडी कडून चौकशी करा. 25-25 वर्ष झाले आम्ही राजकारणात आहोत, पुण्यात बळच एक फ्लॅट रडत पडत घेतला आहे, असंही पुढे सुरेश धस यांनी म्हटलं आहे.