पुणे : पुण्यातील म्हाळुंगे - बालेवाडी येथील शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. त्याचबरोबर अनेकदा इथल्या मोकळ्या मैदानांची जागा विविध पक्ष आणि संघटनांच्या कार्यक्रमांना दिली जाते. त्यामुळं अनेकदा या भागात वाहतूक कोंडी होते. त्यामुळं राज्याच्या क्रीडा विभागाकडून क्रीडा संकुला लगतची जागा पार्किंगसाठी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

म्हाळुंगे - बालेवाडी क्रीडा संकुल 151 एकर जागेमध्ये उभारण्यात आलं आहे. हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, कुस्ती, रायफल शूटिंग, एथलेटिक्स अशा अनेक क्रीडा प्रकारांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या क्रीडा संकुलात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र क्रीडा संकुलाला पुरेसं पार्किंग या भागात उपलब्ध नाही. अनेकदा त्यामुळं संकुलातील जागेवरच व्ही आय पी व्यक्तींची वाहनं उभी केली जातात. त्यामुळं संकुलातील सुविधांचे अनेकदा नुकसान होते. 

पार्किंगसाठी जागा आरक्षित ठेवण्याची मागणी

क्रीडा संकुला लगतच्या एका मोकळ्या जागेचा उपयोग सध्या पार्किंगसाठी म्हणून केला जातो. मात्र ही जागा अनेकदा अपुरी पडते. त्यामुळं मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावेळी बाणेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागतं. त्यामुळं राज्याच्या क्रीडा विभागाकडून पी एम आर डी ए च्या आयुक्तांना पत्र पाठवून पार्किंगसाठी जागा आरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आलीय. पार्किंगसाठी किती आणि कोणती जागा आरक्षित करायची याचा निर्णय पी एम आर डी ए कडून घेण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Dattatray Bharne : इंदापूरमध्ये क्रांती होणार, लायब्ररी, क्रीडा संकुल ते 200 कोटींचा निधी; मंत्री भरणे मामा कडाडले