Pune Metro trial : पुणे मेट्रो अनेक कारणांमुळे चर्चेत असते (Pune Metro) आता मात्र पुणे मेट्रोने आपली नवी ओळख निर्माण केली आहे. इतिहासात पहिल्यांदाच मेट्रो मुळा नदीच्या खालून धावली आहे. पुणे मेट्रोची स्विव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गावर चाचणी पार पडली. पुणे मेट्रोचा हा मार्ग मुळा नदीच्या गर्भातून तयार करण्यात आला आहे. पुणे मेट्रोने चाचणीचा व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. 



पुणे मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गावर चाचणी पूर्ण केली. 5 फेब्रुवारी 2024 रोजी मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथून मेट्रो ट्रेनची चाचणी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी सुरु केली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक पार करून मेट्रो ट्रेन 11 वाजून 59 मिनिटांनी स्वारगेट भूमिगत स्थानक येथे पोहचली (सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते बुधवार पेठ स्थानक अंतर 853 मी, बुधवार पेठ स्थानक ते मंडई स्थानक अंतर 1 किमी आणि मंडई स्थानक ते स्वारगेट स्थानक अंतर 1.48 किमी). या चाचणीसाठी 1 तास वेळ लागला. या चाचणी दरम्यान मेट्रोचा वेग ताशी 7.5 किमी इतका ठेवण्यात आला होता. ही चाचणी नियोजित उद्दिष्टानुसार पार पडली. एकूण 3.34 किमी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली.   यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे मेट्रो प्रकल्पाचे संचालक, अतुल गाडगीळ, विनोदकुमार अग्रवाल (संचलन व प्रणाली), कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे (जनसंपर्क व प्रशासन), राजेश द्विवेदी (संचलन, सुरक्षा व देखभाल) तसेच पुणे मेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


 






स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणार


पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित आहे. या  प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं होतं. स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासन त्याचा पाठपुरावा करून मंजुरी घेईल. खडकवासला ते खडारी हा 25.65 किमीच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. तो देखील मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. या मेट्रोचे शेवटचे स्टेशन खडकवासला धरणापर्यंत असावे अशी मागणी केलेली आहे. त्याची देखील संयुक्त पाहणी झालेली आहे. तो प्रस्ताव फिजिबिलिटी रिपोर्टसह शासनाकडे सादर केलेला असून राज्य शासन त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितलं होतं. आता फक्त या मेट्रोसाठी केंद्राच्या मान्यतेची गरज आहे ती मान्यता मिळाली की मेट्रोचा मार्ग मोकळा असेल. मात्र त्यापूर्वी मेट्रोला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी फेऱ्या वाढवल्या आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि कमी वेळेत होणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


प्रियकराचं डबल डेटिंग, अपमानास्पद वागणूक; प्रियसीने हॉस्टेलमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य!