Pune Metro Ganeshotsav : पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; गणेशोत्सव काळात दर 5 मिनिटांना धावणार मेट्रो, अनंत चतुर्दशीला 41 तास सलग सेवा
Pune Metro Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पुणे मेट्रो प्रशासनाने (Pune Metro Ganeshotsav) प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्सवाच्या काळात भाविकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान मेट्रो फेऱ्यांच्या (Pune Metro Ganeshotsav) संख्येत आणि वेळेत मोठी वाढ करण्यात आली आहे. या काळात गर्दीच्या वेळेत संपूर्ण मेट्रो मार्गावर दर ५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो उपलब्ध असणार आहेत.(Pune Metro Ganeshotsav)
Pune Metro Ganeshotsav : गणेशोत्सवातील मेट्रोचे विशेष वेळापत्रक
पुणे मेट्रोकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात सेवा खालीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने सुरू राहील:
१४ ते १६ सप्टेंबर (सोमवार ते बुधवार): गणेश चतुर्थीपासून ते उत्सवाच्या सुरुवातीच्या दिवसांत सकाळी ६.०० ते रात्री ११.०० या नियमित वेळेत मेट्रो धावेल.
१७ ते २४ सप्टेंबर (गुरुवार ते गुरुवार): गौरी पूजनासह उत्सवाच्या मुख्य दिवसांत भाविकांची गर्दी पाहता मेट्रोची वेळ वाढवून सकाळी ६.०० ते मध्यरात्री २.०० वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
२५ ते २६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी व विसर्जन): उत्सवाच्या मुख्य टप्प्यात २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६.०० वाजेपासून ते सलग २६ सप्टेंबरच्या रात्री ११.०० वाजेपर्यंत अखंड ४१ तास पुणे मेट्रोची सेवा सुरू राहील.
२७ सप्टेंबरपासून: रविवार, २७ सप्टेंबरपासून नेहमीप्रमाणे सकाळी ६.०० ते रात्री ११.०० या वेळेत नियमित सेवा पूर्ववत होईल.
Pune Metro Ganeshotsav : महात्मा फुले मंडई स्टेशनसाठी विशेष नियमावली
मध्य पुण्यात गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मंडई परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे होणारी चेंगराचेंगरी किंवा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रो प्रशासनाने महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनवर न उतरता, हे स्टेशन मुख्यत्वे परती प्रवासासाठीच वापरण्याचे आवाहन केले आहे.(Pune Metro Ganeshotsav)
तसेच १४ ते २६ सप्टेंबर दरम्यान महात्मा फुले मंडई स्टेशनवर एकदिशीय (Unidirectional) मार्ग लागू असेल: प्रवेशासाठी (Entry): लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील गेट क्र. ३ चा वापर करावा. बाहेर पडण्यासाठी (Exit): छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील गेट क्र. २ चा वापर करावा.(Pune Metro Ganeshotsav)
Pune Metro Ganeshotsav : दर्शनासाठी स्टेशन निवडीबाबत महत्त्वाच्या सूचना
गर्दीचे योग्य नियोजन व्हावे यासाठी भाविकांनी प्रवासाच्या दिशेनुसार खालील स्टेशन्सचा वापर करावा: कॉरिडॉर १ (Corridor 1) चे प्रवासी: पेठ भागातील गणपती दर्शनासाठी भाविकांनी कसबा पेठ मेट्रो स्टेशन येथे उतरावे. कॉरिडॉर २ (Corridor 2) चे प्रवासी: वनाजच्या बाजूने येणाऱ्या भाविकांनी डेक्कन जिमखाना स्टेशनचा वापर करावा. रामवाडीच्या बाजूने येणाऱ्या भाविकांनी पीएमसी (PMC) स्टेशनचा वापर करावा. डिस्ट्रिक्ट कोर्ट स्टेशनवर बदल (Interchange) टाळा: मध्य पुण्यात दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी 'डिस्ट्रिक्ट कोर्ट' स्टेशनवर लाईन न बदलता, आपापल्या कॉरिडॉरवरील कसबा पेठ, पीएमसी किंवा छत्रपती संभाजी उद्यान या स्टेशन्सचा वापर करावा. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन व्हावे व प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी सर्व भाविक आणि प्रवाशांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आले आहे.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















