पुणे: राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune Mahanagar Palika Election 2026) उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची वाटप झाल्याचं चित्र दिसून येत आहे. या पैशांच्या वाटपावरून उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीच्या देखील झाल्याच्या, अनेक ठिकाणी पैसे वाटप करतानाचे व्हिडीओ फोटो समोर आल्याची घटना समोर आल्या आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी देखील अेक ठिकाणी लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यात दोन दिवसांत एकूण ९० लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Mahanagar Palika Election 2026) एका मताचा किती रेट आहे, याबाबतची जोरदार चर्चा सुरू होती, अशातच पुण्यातील पत्रकारांनी पुणे पालिकेसाठी मतदानाचा किती रेट आहे याची माहिती दिली आहे. (Pune Mahanagar Palika Election 2026)

एका मतदानाचा रेट किती आहे 

पुण्यात एका मतदानाचा रेट किती आहे या प्रश्नावर पत्रकाराने उत्तर देताना थेट म्हटलं की, एका मताचा सगळ्यात कमी रेट म्हणजे एक हजार रुपये ते दोन हजार रुपये असा फक्त एका मताचा रेट आहे, काही ठिकाणी पाच हजारापर्यंत देखील हा रेट गेलेला आहे, त्यामुळे  आपण अशं समजू की,दोन्ही पॅनल स्ट्रॉंग आहेत असे काही महत्त्वाचे प्रभाग आहेत, पुण्यातील प्रेक्षकांना माहिती आहेत ते प्रभाग कोणते आहेत, तर एका घरात चार मतं असतील तर एका पॅनल मध्ये चार उमेदवार आहेत. एका मताला चार दुणे आठ हजार रुपये, एका पॅनलच्या, दुसऱ्या पॅनलच्या आठ हजार रुपये, एका मताला दोन पॅनल मिळून चार मताला 16 हजार रुपये, आणि जर चार जणांची मतं असतील तर 64 हजार रुपये, आणि ही फॅक्ट आहे, ही अजिबात अतिशोक्ती नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

प्रत्येक बँक खात्याची कॅपॅसिटी किती

पुढे ते म्हणाले ही खरी माहिती आहे, यावेळचे आणखी एक गणित आहे ते म्हणजे यावेळी गुगल पे आणि फोन पे चा धुमाकूळ दिसून येतोय. त्याचबरोबर तुम्ही आज कोणतेही बँकेत जा आणि फायनान्सर ला फोन करा आणि म्हणा मला पाच लाख रुपये कॅश मध्ये द्या, मी फक्त पाच लाख रुपये सांगत आहे, आज ही कॅश उपलब्ध होणार नाही, सध्या कँशचा तुटवडा तुम्हाला दिसून येईल.  महायुतीतील तिन्ही घटक स्ट्रॉंगपणे निवडणूक लढवत आहेत, आणि एकाच वेळी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये निवडणूक होत आहे, म्हणजे कॅशचा किती तुटवडा निर्माण झाला असेल याचा अंदाज लावू शकतो, जर एखाद्या पक्षाने पाच कार्यकर्त्यांना सांगितलं तुमच्या गुगल पे आणि फोन पे वरून पैसे वाटा, तर प्रत्येक बँक खात्याची कॅपॅसिटी किती आहे एका वेळानंतर लिमिट संपत, त्यांची लिमिट संपल्यानंतर ते एकमेकांकडे बघत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे आता कॅश संपली अकाउंटला पैसे टाकले जिथून पैसे मारलेत, ॲपचे लिमिट संपली. या निवडणुकीला हे झालंच पण पुढच्या निवडणुकीला लोकांनी बिटकॉइनमध्ये पैसे घेतले तर नवल वाटायला नको, असंही पुण्यातील पत्रकारांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.