Pune Loni Kalbhor Accident: पुण्यातील काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील लोणी काळभोरमधील एका सोसायटीत खेळताना कारच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. सायकलवर खेळताना 5 वर्षीय मुलाला कारची धडक बसली. यामध्ये सदर चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. 19 जानेवारीला दुपारी ही घटना घडली. (Pune Loni Kalbhor Accident)
नेमकं काय घडलं? (Pune Loni Kalbhor Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणी काळभोर भागातील एका सोसायटीमध्ये पाच वर्षीय मुलगा हा त्याच्या सायकलवर सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत होता. यादरम्यान अचानक त्याच ठिकाणाहून जात असलेल्या कारच्या समोर आल्यामुळे आणि चालकाला तो समोर न दिसल्यामुळे कारची त्याला धडक बसली. गाडीचा वेग अत्यंत कमी असला तरी सुद्धा वाहनाची धडक बसली आणि यात त्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. निष्कर्ष आश्वत स्वामी (वय 5) असे मृत्यमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद- (Pune Car Accident)
याबाबत निष्कर्षचे वडील आश्वत नारायण स्वामी (वय 40,रा. जॉय नेस्ट सोसायटी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्वत स्वामी यांचा मुलगा निष्कर्ष याला घेऊन सासू सरस्वती रेड्डी या सोमवारी (19 जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास सोसायटीच्या आवारात आल्या होत्या. सोसायटीच्या आवारात निष्कर्ष खेळत होता. त्या वेळी सोसायटीच्या आवारात मोटारीने निष्कर्षला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या निष्कर्षला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
पुणे ग्रँड चॅलेंज या सायकल स्पर्धेनिमित्त पुणे पोलिसांकडून अजब सूचना- (Pune Cycle Grand Tour 2026)
पुणे ग्रँड चॅलेंज या सायकल स्पर्धेनिमित्त पुणे पोलिसांकडून अजब सूचना देण्यात आल्या आहेत. सायकल स्पर्धेनिमित्त पुणे पोलिसांच्या अंतर्गत येणाऱ्या डेक्कन पोलिस ठाण्याकडून सूचना जारी करण्यात आल्या आहे. सायकल स्पर्धेनिमित्त आज पुणे पोलिसांकडून विविध सूचना आणि नियमावली देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी यासाठी पोलिसांकडून पुणेकरांना सूचना जारी केली आहे. वाहतुकीत बदल प्रमाणे सोसायटीतील रहिवासी यांना सुद्धा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आपली लहान मुले आणि पाळीव प्राणी यांना रस्त्यावर किंवा सोसायटीच्या गेटजवळ मोकळे सोडू नका. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण शिस्तबद्ध पद्धतीने फुटपाथवर थांबू शकता, तसेच टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहन देऊ शकता, अशा डेक्कन पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
