Pune leopard News : पुणे जिल्ह्यातील (Pune) मावळ तालुक्यातील वस्ती (leopard ) परिसरात सोमवारी दोन वर्षांत पहिल्यांदाच बिबट्या आढळला. जखमी बिबट्याची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे. सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बिबट्या इमारतीच्या आवारात दिसला, त्यांनी तत्काळ याची माहिती वनविभागाला दिली. पवना धरणाजवळील नैसर्गिक अधिवासातून भटकून बिबट्या पानसोल गावात पोहोचला होता. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याची सुटका केली. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व त्यांचे पथकही घटनास्थळी पोहोचले.
सहाय्यक वनसंरक्षक काय म्हणाले?
सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे म्हणाले, रहिवासी परिसरात काटेरी तारांच्या कुंपणावर बिबट्या जखमी अवस्थेत आढळला. ये शिकार की तलाश में आया होगा. मात्र, तो काटेरी तारांचे कुंपण ओलांडण्यात अपयशी ठरला आणि प्रक्रियेत तो जखमी झाला.
पशुवैद्यकीय पथकाद्वारे उपचार
आठ ते नऊ महिन्यांच्या या बिबट्याला सुरुवातीला शांत करण्यात आले आणि नंतर पशुवैद्यकीय पथकाने जखमी बिबट्यावर उपचार केले. त्यात किरकोळ जखमा झाल्या होत्या. उपचारानंतर बिबट्याला रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट भुगाव येथे पाठवण्यात आले. अधिका-यांनी सांगितले की, पशुवैद्यकीय पथकाद्वारे त्याची तपासणी केली जाईल आणि नंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. मावळ तालुक्यात बिबट्या प्रामुख्याने पिंपरी-चिंचवडपासून 40 किमी अंतरावर असलेल्या पवना धरणाच्या आसपास आढळतात. निवासी भागात बिबट्या दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
चाकणमध्येही केला होता बिबट्याने शिरकाव
मागील वर्षी मार्च महिन्यात पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये पहाटे बिबट्या आढळला. हा बिबट्या मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत घुसल्याचं कंपनीमधील एका चालकाच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बिबट्या असल्याची खात्री करून घेतली. तसेच त्यांनी याबाबत वनविभागाला कळवलं होतं.जवळपास सात तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. कंपनीच्या बॉडी शॉप सेक्शनमधील कामगारांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आलं होतं. चाकण एमआयडीसीत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या असल्याने, या एमआयडीसीची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख आहे. याच एमआयडीसीमधील मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत आज बिबट्याने शिरकाव केला होता. यामुळं एमआयडीसीसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली होती. कंपनी साधारण शंभर एकरमध्ये विस्तारल्यानं बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर होतं. मदतीला पिंपरी चिंचवड पोलीस ही दाखल झाले होते.