Pune Koyta Gang : पुण्यात (Pune) 21 वर्षीय (koyta Gang)  तरुणाचा कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. वाघोली (Wagholi) येथील एका महाविद्यालयमध्ये तो शिकत होता आणि  तेथे एका होस्टेलमध्ये राहत होता. महेश डोके असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. 


21 वर्षीय मुलावर कोयत्याने वार


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय मुलावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर तातडीने सदर जखमीस रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु त्याला ससून रुग्णालयात पुढे पाठवण्यात आले ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हा युवक हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता आणि एका होस्टेलमध्ये राहत होता. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तपासा दरम्यान समोर आलेल्या बाबीनुसार ही हत्या समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे. परंतु नेमक्या कारणाचा अजूनही शोध घेत आहोत. आरोपीच्या शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी लोणीकंद (Lonikand) पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


कोयता गँगच्या दहशत (Koyta Gang) 


काही दिवसांपासून कोयता गँगच्या (Koyta gang) दहशतीत वाढत होताना दिसत आहे. अनेकांच्या मुसक्या आवळून देखील कोयता गँगचा हैदोस संपताना दिसत नाही आहे. पुण्यात मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern) चित्रपटाचा थरार पुन्हा पाहायला मिळाला. पुण्यात पाळलग करत कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला होता. शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही  ज्यांचा खून होतोय ते देखील आणि जे खून करताय ते देखील अगदी कमी वयाचे युवक असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यात कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला होता.  पाठलाग करून कोयत्याने हल्ला करून  खून केला होता. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा  प्रकार घडला होता.  पाठलाग करत तरूणाला इमारतीच्या छतावर गाठले आणि कोयत्याने वार करत तरुणाचा खून करण्यात आला होता.किरकोळ वादामधून तरुणावर कोयत्याने वार करत खून केल्याची महिती मिळत होती.


इतर महत्वाची बातमी-


Uttarkashi Tunnel Rescue Operation : बोगद्यात 41 मजूर कसे अडकले? 17 दिवसांपूर्वी काय घडलं होतं, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम