राष्ट्रवादी एकत्रीकरणाचे पहिले पाऊल जुन्नरमध्ये, अतुल बेनके आणि अमोल कोल्हेंचा एकत्र पुढे जाण्याचा निर्णय
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं पहिलं पाऊल पुणे जि्ह्यातील जुन्नरमध्ये पडलं आहे. मी आणि खासदार अमोल कोल्हे एकत्रित वाटचाल करणार असल्याचे मत माजी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
Pune : राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र .येण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र काम करावे असा चर्चा सुरु आहे. अनेक नेत्यांनी तशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. अजित पवार यांना देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असे वाटत होते, अशी माहिती नेत्यांनी दिली आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं पहिलं पाऊल पुणे जि्ह्यातील जुन्नरमध्ये पडलं आहे. मी आणि खासदार अमोल कोल्हे स्थानिक स्वराज संस्था एकत्रीत लढलो.,आम्ही सर्वांनी जुन्नर तालुक्याने ठरवले आहे की पुढे काय होईल माहिती नाही, पण जुन्नरमध्ये आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित वाटचाल करणार आहोत अशी माहितची माजी आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
उपमुख्यमंत्री बनल्यानंतर सुनेत्रा पवारांनी पहिली बैठक घेतली ती पुण्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवारांसोबत. या बैठकीत सुनेत्रा पवारांनी विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना आपल्याला अजित दादांचा कामाचा वारसा पुढे न्यायचा असल्याने सकारात्मक पद्धतीने काम करण्याचं आवाहन नवनिर्वाचित उमेदवारांना केलं. सुनेत्रा पवारांना यावेळी जुन्नर तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भेटले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अतुल बेनके यांनी राज्यात दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होईल की नाही याबाबत आपल्याला माहिती नाही मात्र जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्ही पदाधिकाऱ्यांनी इथुन पुढे एकत्रच रहायच ठरवलं आहे असं म्हटलंय. या भुमिकेला सुनेत्रा पवारांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा अतुल बेनके यांनी केला आहे.
अजित पवार जसे जुन्नर तालुक्याला पाठबळ देत होते तसेच पाठबळ सुनेत्रा पवार देतील : अतुल बेनके
मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचे शपथ घेतली. अजितदादांच्या निधनानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सामोरे गेलो. नेतृत्व स्वीकारणं आणि कार्यकर्त्यांना घेऊन पुढे सुनेत्रा पवार यांना भेटलो. जुन्नरमधील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी सुनेत्रा पवार उभे राहतील असा आम्हाला त्यांनी विश्वास दिल्याचे बेनके म्हणाले. जिजामाता सारखी चुणूक आम्हाला सुनेत्रा वहिनींमध्ये दिसल्याचे बेनके म्हणाले. अजित पवार यांचे विचार काम पुढे जात आहोत. अजित दादांचे प्रतिबिंब सुनेत्रा पवार यांच्यामध्ये बघून आम्ही पुढे जात आहोत असे बेनके म्हणाले. अजित पवार जसे जुन्नर तालुक्याला पाठबळ देत होते तसेच पाठबळ सुनेत्रा पवार देतील असे बेनके म्हणाले.
आम्हाला जिल्हा परिषदमध्ये पद मिळावे अशी आमची इच्छा होती. मी आणि खासदार अमोल कोल्हे सागून आम्ही स्थानिक स्वराज संस्था एकत्रीत लढले आहे. आम्ही सर्वांनी जुन्नर तालुक्याने ठरवले आहे की पुढे काय होईल माहिती नाही पण जुन्नर मध्ये आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित वाटचाल करणार आहोत. आता पुढची वाटचाल कशी करायची यांबाबत चर्चा झाली आहे. दादा नाहीत मग पुढे काय अशी चर्चा झाल्याचे बेनके म्हणाले.
दोन पक्षांतील मतांची विभागणी आम्हांला नको म्हणून एकत्र लढलो
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्रित येऊन लढवली होती. अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी त्यासाठी तयारी दर्शविली होती. फक्त घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवायच आम्ही ठरवलं होतं. दोन पक्षांतील मतांची विभागणी आम्हांला नको होती असे बेनके म्हणाले. निवडून आलेल्या सदस्यांसह आम्ही आज सुनेत्रा पवारांना भेटलो. यावेळी घड्याळ आणि तुतारी या दोन्ही पक्षांचे तालुकाध्यक्ष देखील उपस्थित होते असे बेनके म्हणाले. सुनेत्रा वहिनींना आम्ही संगितले की राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होईल की नाही माहीत नाही पण जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्हा सर्व नेत्यांनी एकत्रित रहायचं ठरवलं आहे. यावर सुनेत्रा पवारांनी चांगली गोष्ट आहे असं म्हणत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे बेनके म्हणाले.
























