पुणे: पुण्यात पावसाचा (Pune Rain) जोर वाढला आहे. खडकवासला धरणातून 2 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. थोड्याच वेळात पाण्याचा (Pune Rain) विसर्ग नदीत होणार आहे. नदीकाठ परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये ज्यांची गाड्या आणि जनावर आहेत, त्या नागरिकांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
यंदाचा मोसमात पहिल्यांदा होणार पाण्याचा विसर्ग
पुण्यातून वाहणारी मुळा नदीचे पात्र भरून वाहत आहे. पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर पुण्यातील मोठा नदीचे पात्र देखील वाढले आहे. लोणावळा लगतच्या मळवली ते देवळे गावचा संपर्क तुटला आहे. ओढे-नाल्याच्या ठिकाणी पाणी रस्त्यावर आलं आहे. पुणे-लोणावळा रेल्वेतून हा परिसर कसा जलमय झाला आहे. सकाळी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं. आता पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानं परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. सध्या मळवली ते देवळे गावच्या ग्रामस्थांना लोणावळा मार्गे वळसा मारावा लागत आहे.
खडकवासला धरणातून दुपारी दोन वाजता दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. त्याआधीच मुठा नदीत ओढ्या - नाल्यांचे पाणी आल्याने नदीची पाणीपातळी वाढली आहे. डेक्कन भागातील भिडे पुल गेले काही महिने वाहतुकीसाठी बंद आहे. मात्र वाढलेल्या पाण्यामुळे पुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी पोहचलं आहे. धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. खडकवासला धरणातुन दुपारी दोन वाजता दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. त्याआधीच मुठा नदीत ओढ्या - नाल्यांचे पाणी आल्याने नदीची पाणीपातळी वाढलीय. डेककन भागातील भिडे पुल गेले काही महिने वाहतुकीसाठी बंद आहे. मात्र वाढलेल्या पाण्यामुळे पुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी पोहचलं आहे.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. माहिती साठी सविनय सादर. मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतेय. त्यामुळे महापालिकेकडुन भोंगा वाजवून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येतोय.
सकाळी रस्त्यावर गुडघाभर पाणी
लोणावळा लगतच्या मळवली ते देवळे गावचा संपर्क तुटला आहे. ओढे-नाल्याच्या ठिकाणी पाणी रस्त्यावर आलं आहे. पुणे-लोणावळा रेल्वेतून हा परिसर कसा जलमय झाला आहे, हे टिपण्यात आला आहे. सकाळी रस्त्यावर गुडघाभर पाणी होतं. आता पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानं परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. सध्या मळवली ते देवळे गावच्या ग्रामस्थांना लोणावळा मार्गे वळसा मारावा लागतोय.