Pune: पुण्यात वेगाने पसरत असणाऱ्या गुलेन  बॅरी सिंड्रोम (Guillain barre syndrome) या मेंदू विषयक आजाराने गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत जीबीएसचे 5 संशयास्पद मृत्यू नोंदवले गेल्यानंतर अशुद्ध पाण्यामुळे दिवसेंदिवस या रोगाचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं. जीबीएस फोफावत असल्यानं शुद्ध पाण्याबाबत सगळेच गांभीर्याने विचार करत असताना पिंपरी चिंचवड शहरात 13 ठिकाणाचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा धक्कादायक अहवाल वैद्यकीय विभागाने समोर ठेवलाय. पण दुसरीकडे वैद्यकीय विभागाचा अहवाल चुकीचा असल्याचा सांगत पाणीपुरवठा विभागाने पुन्हा त्याच ठिकाणचे नमुने घेत सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा केलाय. आता एकाच भागातले दोन अहवाल वेगवेगळे सांगू लागल्याने नागरिकांमध्ये पाणी वापरायचं का नाही? याबाबत संभ्रम आहे.


GBS रुग्णांच्या घरातील पाण्याचे 2 अहवाल 


पुण्यात वाढत्या जीबीएसच्या रुग्णांमुळे आधीच नदीतून उपसा केलेला अशुद्ध पाणी थेट घरोघरी दिल जात का? पाण्याची गुणवत्ता पिण्यायोग्य आहे का? वैद्यकीय आणि पाणीपुरवठा विभागातील समन्वयाचा अभाव दिसून आला. जीबीएस लागण झालेल्या रुग्णांच्या घरातील पाण्याचे नमुने घेत त्यावर राज्य आरोग्य प्रयोगशाळेतून वैद्यकीय विभागांना नमुने घेऊन परीक्षण केलं होतं. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात 13 ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल वैद्यकीय विभागाने समोर ठेवला होता. या अहवालाने मोठी खळबळ उडाल्यानंतर मात्र पुन्हा त्याच ठिकाणचे नमुने पाणीपुरवठा विभागांना घेतले. त्यातून वैद्यकीय विभागाचा अहवाल चुकीचा असल्याचा सांगत सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केलाय. आता एकाच भागात वैद्यकीय विभागाचा ऐकायचं की पाणीपुरवठा विभागाचा ऐकायचं असा प्रश्न नागरिकांना पडलाय? या दोन अहवालांमुळे पालिकेच्या वैद्यकीय आणि पाणीपुरवठा विभागातील असमन्वय दिसून आला. दुसरीकडे दोन्ही अहवालांपैकी खरा कोणता मानायचा आणि खोटा कोणता? असा मोठा संभ्रम शहरवासीयांमध्ये निर्माण झालाय. हे सगळं घडत असताना पालिका आयुक्त शेखर सिंग यांचं या गंभीर बाबींकडे लक्ष नव्हतं का ?असा प्रश्न उपस्थित झालाय. 


पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख काय म्हणाले?


पिंपरी चिंचवड जीबीएस चे 18 रुग्ण आढळलेत त्यातल्या 13 रुग्णांच्या घरचे पाण्याचे नमुने जे आहेत ते सकारात्मक आढळलेत त्यामुळे खळबळ उडाली आहे. हा वैद्यकीय विभागाचा अहवाल आहे. पाणीपुरवठा विभागानेसुद्धा याच ठिकाणी जाऊन नमुने घेतलेले आहेत आणि त्याचा अहवाल नेमका काय समोर आला? याबाबत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख प्रमोद ओंभासे म्हणाले, तुम्ही जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी जे 13 नमुने अयोग्य जे आलेले होते तर पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये जाऊन सदर ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासा म्हणून सूचना केल्या होत्या .त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाणी चेक केलेला आहे आणि त्याच्यात पाणी पिण्यास योग्य आढळलेलं आहे. 


पाण्याचे नमुने घेताना त्या नळाचे पाणी येतं ते पाणी तपासले पाहिजे. ते पाणी साठवलेले असल्याची शक्यता असते ती कुठल्या भांड्यात साठवलेला असेल, कँटमिटेड होऊ शकत त्या पाण्याचे नमुनी तपासणी घेतल्यानंतर ते अयोग्य आले असतील. वैद्यकीय विभाग आणि पाणीपुरवठा विभाग या दोघांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यासाठी वैद्यकीय विभाग ज्या ठिकाणी पाण्याचे नमुने तपासले तिथे पाणीपुरवठा विभागाचे ही अभियंते इथून पुढे असणार आहेत. यासाठी 12 अभियंत्यांची नेमणूक करण्यात आल्याचं पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख ओंभासे असे म्हणाले .


हेही वाचा


Guillain Barre Syndrome: घरातल्या नळाच्या पाण्याने जीबीएस होतो? पाण्याची गुणवत्ता खरंच पिण्यायोग्य असते का? एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट