Pune Ganesh Visarjan 2025: पुण्यातील पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनाआधीच इतर मंडळांना मिरवणुकीत सहभागी होऊ द्यावे, अशी मागणी अनेक मंडळांनी केली आहे. याशिवाय, प्रत्येक गणेश मंडळासोबत स्वतंत्र ढोल-ताशा पथक न देता एकाच पथकाचा वापर करावा, अशी सूचनाही समोर आली आहे. (Ganesh Visarjan 2025)
पुण्यातील गणपती मंडळाची सकाळी सात वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक निघणार आहे. मानाचे पाच गणपतीही सकाळी सात वाजल्यापासून मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. पुण्यातील गणेश मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. विसर्जन मिरवणुकींना होणारा उशीर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं समोर येतंय. मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन फोन शहरातील इतर शेकडो गणेश मंडळांच्या गणपतीचं विसर्जन होण्यासाठी संध्याकाळ होते. त्यामुळे त्यांची वाद्य ढोल पथक मिरवणुका करण्यासाठी दुसऱ्या दिवशीपर्यंत मिरवणूक लांबते. त्यामुळे इतर गणेश मंडळांनी एकत्र येत पुण्यात बैठक घेतली. यात पुण्यातील पाच मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका या सकाळी सात वाजता व्हाव्यात, जर त्या होणार नसतील तर इतर मंडळ सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूक काढायला तयार आहेत असं या बैठकीत मांडण्यात आलं.
नेमकं होणार काय?
बाळासाहेब ठाकरे कलादालनात झालेल्या बैठकीत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असून,पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणार असल्याच जाहीर केलय. मानाच्या गणपतींमुळे आमच्यावर अन्याय होत असल्याच या मंडळा़च म्हणणय.त्यामुळे विसर्जनाच्या वेळापत्रकात आणि मिरवणूक रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या बैठकीला 70 पेक्षा अधिक मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीला लागणारा वेळ पाहता पाच मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणूकीत सहभागी होण्याची इच्छा काही गणेश मंडळांनी व्यक्त केलीय.
पुण्यातील लक्ष्मी रसत्यावरील विसर्जन मीरवणूकीत 300 पेक्षा अधिक गणेश मंडंळं सहभागी होतात. मात्र पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन होईपर्यंत संध्याकाळ होते. पुण्याची विसर्जन मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरु होते. मात्र यावेळी अनेक मंगळांनी पाच मानाच्या गणपतींच्या आधी सात वाजल्यापासुन मीरवणूकीत सहभागी होण्याची तयारी दर्शवलीय. त्याचबरोबर प्रत्येक मंडळाने एकच ढोल ताशा पथक वापरावे याबद्दल देखील या बैठकीत चर्चा झालीय.पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणार असल्याच जाहीर केलय. मानाच्या गणपतींमुळे आमच्यावर अन्याय होत असल्याच या मंडळा़च म्हणणय.
प्रत्येक मंडळासोबत एकच ढोलपथक?
यंदा प्रत्येक मंडळासाठी एकच ढोल-ताशा पथक असावे, अशी सूचना बैठकीत मांडण्यात आली. यामुळे विसर्जन मिरवणूक अधिक वेगाने पुढे सरकू शकते आणि तांत्रिक अडचणीही कमी होतील, असंही मत मांडलं गेलं. दरम्यान, लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक वर्षी 300 हून अधिक गणेश मंडळं सहभागी होतात. त्यामुळे मिरवणुकीचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. वेळेचं बंधन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वेळेत विसर्जन पार पाडणं आवश्यक असतं. सदर बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंतिम रूपरेषा लवकरच पुणे पोलिस प्रशासनासोबत होणाऱ्या बैठकीत मांडली जाणार आहे. त्या अनुषंगानेच विसर्जनाच्या वेळा, मंडळांचा क्रम आणि ढोल-ताशा पथकांचा नियोजन स्पष्ट होणार आहे. गणेश विसर्जन 2025 मध्ये बदल पाहायला मिळणार का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.