पुणे :  पुण्यातील गणपती मिरवणुका यंदाही (Pune Ganeshotsav 2023) चांगलीच लांबली असल्याचं चित्र आहे. मिरवणुकीला तब्बल 22 उलटूनही आणखी 200 पेक्षा जास्त मंडळांच्या गणपती विसर्जन बाकी आहे. अजूनही पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांची मिरवणूक सुरू आहे. मंडळांनी लवकरात लवकर बाप्पाला निरोप द्यावा म्हणून पुणे पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. अनेकवेळा 2 मंडळांमध्ये (Pune news) अंतर जास्त (ganpati mandals) असल्यामुळे वेळ लागतो आहे म्हणून पोलिसांकडून मंडळांना पुढे सरकत रहा अशा सूचना आणि आवाहन केले जातं आहे. 


पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी अलका टॉकीजमध्ये हजर होते. वेळोवेळी सुचना देण्यात आल्या. त्यांच्याकडून मंडळांनादेखील आधीच बजावण्यात आलं होतं. मात्र पोलिसांचा वचक वाटत नसल्याचं दिसून येत आहे. मंडळांकडून त्यांच्या मनाप्रमाणे विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. रात्रीदेखील पोलिसांनी अनेक मंडळांना विसर्जनाच्या सूचना दिल्या होत्या मात्र तरीही विसर्जन मिरवणूक संपली वेळेत संपवता आली नाही. 


पुण्याच्या मानाच्या गणपतींचं विसर्जन वेळेत पार पडलं. पुण्याच्या मानाचा पहिल्या कसबा गणपतीचं 4:35 मिनीटांनी तर मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन सायंकाळी 5.10 वाजता झालं. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन हे 5: 55 मिनीटांनी झालं तर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे विसर्जन रात्री 6:32 वाजता झालं. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन रात्री 6:58 मिनीटांनी करण्यात आलं. पुण्यातील पाचही गणपतींचे विसर्जन मोठ्या भक्तीमय वातावरणात करण्यात आलं. 


दगडूशेठ हलवाई गणपतीनंतरची मंडळे रेंगाळली...


गेल्या गणेशविसर्जनाच्यावेळी पुण्यातील मिरवणुका या तब्बल तीस तास चालल्या होत्या. दरवर्षी या मिरवणुकीला लागणार वेळ वाढत वाढत तीस तासांवर गेला. यावर्षी तसे होऊ नये म्हणून गणपती विराजमान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुण्यात विसर्जन मिरवणुकांच्या कार्यक्रमांवर बैठका सुरु झाल्या. पुणे पोलिस आणि गणेश मंडळांच्या चर्चांनंतर उद्याच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये कसं नियोजन असणार? याच्या चर्चा झाल्या. एवढच नाही तर यंदा विसर्जन मिरवणुका वेळेत होण्याचा विश्वास अनेक मंडळांकडून व्यक्त करण्यात आला. कारण, दरवर्षी पुण्यातील पाच मानाचे गणपती विसर्जित होण्यास संध्याकाळ होते.  दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन नऊ वाजण्याच्या आत झाले. मात्र पुढची मंडळे रेंगाळली त्यामुळे  पुण्यातील गणेश मंडळांमधील अंतर्गत चढाओढ चर्चेचा विषय बनलीय.


इतर महत्वाची बातमी-


Pune Ganeshotsav 2023 : अलका चौकात भव्य 100 फुटाची रांगोळी रेखाटायला सुरुवात; पाहा ड्रोन फोटो...