Pune Crime News: पुण्यातील (Pune)हडपसर पोलिस ठाण्याच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एका ट्रकमधून हैदराबादहून मुंबईकडे नेला जाणारा 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक (arrest) करण्यात आली आहे. हा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे.


श्रीराम यादव असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. त्याचे साथीदार सिडलेदत्त रेड्डी, विष्णू रेड्डी, सुशांत रे आणि दीपक कोठारी यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल सदाशिवराव गवते यांनी तक्रार दिली होती.


नेमकं काय घडलं?
२९ जून रोजी गुटख्याने भरलेला ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता. याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला लागली आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा ट्रक हडपसर येथे अडवला. ट्रकमध्ये 40 पोत्यांमध्ये 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला, आणि पोलिसांनी तो जप्त केला”, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांनी सांगितले.



पुण्यात 43 किलो अमली पदार्थ जप्त
पुणे  पोलीस विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली होती. यात एका महिलेसह चार जणांना गांजाची (drug) तस्करी केल्याप्रकरणी अटक (arrest)  केली होती. उरळीकांचन आणि लोणीकाळभोर परिसरात 8.5 लाख रुपये किमतीचा 43 किलो गांजा आणि 20 लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली होती.


पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर व त्यांचे पथक उरळी कांचन परिसरात गस्त घालत होते. तेव्हा कोणीतरी गांजा विकायला येत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांनी इतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलीस पथकाने सापळा रचला. या पथकाने यशस्वीरित्या सापळा रचून गाडी अडवली. दिनेश सोपान काळे (वय 31) याला ताब्यात घेतले. वाहनातून 4 लाख 18 हजार रुपये किमतीचा 20 किलो 750 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होते.