एक्स्प्लोर

Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये छेडछाड, रोहिणी खडसेंकडे बोट, अडचणी वाढणार

Pune Drug Party : सोनार नावाच्या व्यक्तीने रोहिणी खडसे यांच्या सांगण्यावरुन प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये छेडछाड केल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला.

पुणे : प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांनी न्यायालयात तपासाची माहिती सादर केली आहे. या माहितीमधे प्रांजल खेवलकर यांच्या जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधे छेडछाड करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला. ही छेडछाड प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या सांगण्यावरुन करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यामुळे रोहिणी खडसे यांच्यासमोरील अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी पार्टी प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. त्यापैकी एका मोबाईलमधील सीम कार्ड हे सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावावर होते.

प्रांजल खेवलकर अटकेत असताना सोनार नावाच्या व्यक्तीने त्याच्या नावावर असलेले सीम कार्ड हरवल्याचा दावा करत त्याच नंबरचे दुसरे सीम कार्ड खरेदी केले. ते कार्ड नवीन मोबाईलमधे टाकले आणि त्या मोबाईलच्या माध्यमातन त्या नंबरचा सगळा डेटा डीलट केला.

सोनारने केलेले हे कृत्य पुरावे नष्ट करण्याचा प्रकार असल्याच पुणे पोलीसांच म्हणणं आहे. सोनार हा जळगाव जिल्ह्यातील असन सोनारने केलेले हे कृत्य त्याने रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरुन केल्याची माहिती पोलिसांना दिली असा पोलीसांचा दावा आहे. यामुळे रोहिणी खडसे अडचणीत येऊ शकतात.

प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ

प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवत 'ऐसा माल चाहिए' असा मेसेज केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

कोण आहेत प्रांजल खेवलकर?

प्रांजल खेवलकर राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत, पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून लांब आहेत. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
NEET Exam Paper Leak: आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
Pune Crime News: पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये धक्कादायक घटना, पार्टी संपल्यावर घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये नेलं अन् महिलेसोबत नको ते केलं
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये धक्कादायक घटना, पार्टी संपल्यावर घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये नेलं अन् महिलेसोबत नको ते केलं
NEET UG paper leak RCC class Motegaonkar Sir: डॉक्टर आणि इंजिनिअर घडवणाऱ्या फॅक्टरीचा मालक, वर्षाला कोचिंग क्लासचा 100 कोटींचा टर्नओव्हर, आता NEET पेपरफुटीप्रकरणी अटक, कोण आहेत प्रोफेसर शिवराज मोटेगावकर?
डॉक्टर आणि इंजिनिअर घडवणाऱ्या फॅक्टरीचा मालक, वर्षाला कोचिंग क्लासचा 100 कोटींचा टर्नओव्हर, आता NEET पेपरफुटीप्रकरणी अटक, कोण आहेत प्रोफेसर शिवराज मोटेगावकर?

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण!
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
Embed widget