Pune Crime : जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यातून पळून जाताना उंच इमारतीवरुन उडी मारल्याने पुण्यात एकाचा मृत्यू झालाय. पुण्यातील नाना पेठेत ही घटना घडलीय. ब्रायन रूडॉल्फ गियर असं मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नाना पेठेतील लाजवंती लॉजमध्ये जुगार चालू असल्याचे समजल्यावर पुणे पोलीसांच्या (Pune Crime) गुन्हे शाखेने तिथे छापा टाकला. त्यावेळी झालेल्या पळापळीत ब्रायन रूडॉल्फ गियर नावाच्या व्यक्तीने गॅलरीतून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला.
बिहारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरुन केला खून
विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत असताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमधील एका शिक्षकाने पुण्यात येऊन पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरुन खून केला होता. त्यानंतर पत्नीचा खून करण्यासाठी बिहारला निघालेल्या पतीस पिंपरी चिंचवड पोलिसांनी कल्याणमध्ये बेड्या ठोकल्या. हा पती बिहारच्या सरकारी शाळेत शिक्षक आहे. राजीव कुमार असं त्याचं नाव असून त्याने मित्र धीरज कुमारच्या साथीने हे कृत्य केलं आहे.
गणेशोत्सवादरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये तीन खून
पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. गणेशोत्सवादरम्यान एकाने थेट फिनिक्स मॉलच्या दिशेने गोळीबार केला तर दोघांनी एकाचा गळा चिरून खून केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या.
यामुळं शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतरही गुन्हेगारीचे सत्र पुण्यात थांबलेलं नाही.
पुण्यातील मध्यवर्ती भागात माजी नगरसेवकाची हत्या
पुण्यात गेल्या महिन्यात एका माजी नगरसेवकाची पुण्यातील मध्यवर्ती भागात टोळक्याने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर राज्यात विरोधकांनी पुणे हे क्राइम कॅपिटल झालं आहे, अशी टीका केली होती. णेशोत्सव सुरू झाल्यापासून वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन खून आणि दोन ठिकाणी गोळीबारासह चोऱ्या-माऱ्यांच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, पुण्यात सातत्याने गुन्हेगारी कृत्य समोर येत असल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सामान्य नागरिकांकडून वाढत चाललेल्या क्राईम रेटबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या