Pune Crime :  पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आले आहे. जामखेडमधून पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलंय. मोशीतील निर्जनस्थळी जात दोघांनी टोकाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोघांच्या आत्महत्याचे कारण काय? याबाबत पोलिसांनी तपास सुरु केलाय. 

Continues below advertisement


जामखेडच्या दोन मित्रांची पिंपरी चिंचवडमध्ये आत्महत्या 


1) तुषार अशोक ढगे वय 25 वर्ष  2) सिकंदर सल्लाउद्दीन शेख वय 30 वर्ष (राहणार हुंडा पिंपळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. मयत तुषार यांचा चुलता दत्तात्रय रावसाहेब ढगे राहणार सणसवाडी तालुका शिरूर यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे दोघे एकमेकांचे मित्र असून काल मूळ गावावरून पुण्याला आल्याचे समजले आहे...एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील  भारतमाता चौकाजवळील खिरीड वस्ती, मोशी या ठिकाणी आज रोजी (दि.12) एका लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला दोन इसमांनी गळफास घेतला आहे. दोघांच्या मृत्यूची चौकशी करीत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


दोघांनी एकाच झाडाला एकाचवेळी गळफास घेतल्यानं हळहळ


अधिकची माहिती अशी की, जामखेडच्या दोन मित्रांनी एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केलीये. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना आज सकाळी (दि.12) उघडकीस आली. हे दोघे ही चालक आहेत, मात्र त्यांनी एकत्रित आत्महत्या का केली असावी? याचं कारण अद्याप ही अस्पष्ट आहे. मोशीतील निर्जनस्थळी दोघांनी एकाच झाडाला एकाचवेळी गळफास घेतल्यानं हळहळ व्यक्त केली जातीये. ते जामखेडवरुन मोशीत कधी आले? कशासाठी आले? अन आत्महत्या का केली? याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करतायेत.


 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेले दोन मित्र अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातले आहेत. मात्र, त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही अचानक गावावरुन पिंपरी चिंचवडमध्ये आले आणि त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलाय. दोघांनी आत्महत्या का केली? याबाबतचा तपास आम्ही करत आहोत. 





इतर महत्त्वाच्या बातम्या 


सुहागरात्रीलाच नवरा म्हणाला, मला तुझा चेहरा आवडत नाही, प्रेयसीचा फोटो काढून दाखवला; 20 लाखांची मागणी करत हातात पेट्रोल घेतलं अन्.. भयंकर प्रकाराने थरकाप


Udayanraje Bhosale : शिवरायांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, युगपुरुषांबाबत नॉन बेलेबल कायदा करावा, किल्ले रायगडावर उदयनराजेंच्या अमित शाहांकडे मोठ्या मागण्या