Pune Crime : मैत्रिणीला कोल्ड कॉफीमधून (Cold Coffee) गुंगीचे औषध देत पाच लाखांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime NEws) आंबेगाव बुद्रुक परिसरातील विवा सोसायटीत घडली आहे. या प्रकरणी 25 वर्षीय तरुणीला सिंहगड रोड पोलिसांकडून (Police) अटक करण्यात आली आहे. दोघीही तरुणी विवाहित असून विवाहापूर्वी त्या रूममेट असल्याची माहिती समोर येत आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी तरुणी एकमेकींच्या मैत्रिणी असून दोघी विवाहित आहेत.  विवाहापूर्वी त्या पुण्यातील सदाशिव पेठेत एका खोलीत राहत होत्या. फिर्यादी एका अभ्यासक्रमाला प्रशिक्षणार्थी तर आरोपी तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. लग्नानंतर एक आंबेगाव बुद्रुक, तर दुसरी आंबेगाव पठार परिसरात वास्तव्यास आहे. दोघींची पूर्वीची मैत्री असल्यामुळे लग्नानंतर देखील त्यांचे एकमेकींच्या घरी येणे-जाणे सुरू होते.

कोल्ड कॉफीत मिसळले गुंगीचे औषध 

आरोपी तरुणीला शेअर मार्केट आणि ऑनलाइन गेमिंगचा नाद असून 6 मार्चला दुपारी चारच्या सुमारास आरोपी तरुणी फिर्यादीच्या घरी कोल्ड कॉफी घेऊन आली होती. तिने कोल्ड कॉफीत गुंगीचे औषध मिसळले होते. कॉफी पिल्यानंतर फिर्यादी तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपी तरुणीने फिर्यादीच्या कपाटात ठेवलेले 5 लाख 46 हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केली होती. 

दागिने लंपास करणाऱ्या तरुणीला बेड्या 

फिर्यादी तरुणीला काही दिवसांनंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. तिने आरोपी तरुणीला याबाबत विचारणा केली असता तिने दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच, ते दागिने परत करते असे देखील सांगितले. त्यानंतरही आरोपीने दागिने परत न केल्याने फिर्यादी तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी तरुणीला अटक केली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Deenanath Mangeshkar Hospital: नाव सोनुबाई अन् हाती कथलाचा वाळा! दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सहा वर्षात इन्कम टॅक्सचा एकही रुपया भरला नाही

महिलेचा सांगाडा सापडला, पोलिसांनी बायकोची हत्या केली म्हणून नवऱ्याला थेट जेलमध्ये पाठवलं अन् तिच महिला बॉयफ्रेंडसोबत हाॅटेलमध्ये रंगेहाथ सापडली