एक्स्प्लोर

Pune Crime News: त्याच्याशी बोलू नको! नवऱ्याच्या तंबीनंतर पत्नीचा एक्स बॉयफ्रेंड संंतापला, सपासप वार करुन अजयला संपवण्याचा प्रयत्न पण..., चाकण हादरलं

Pune Crime News: अजयकुमारने त्यांना जाब विचारला असता अंकिता आणि सचिनकुमार या दोघांनीही अजयकुमार यांना मारहाणीस सुरवात केली.

चाकण: पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने घरातच आपल्या पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा (Pune Crime News) संतापजनक प्रकार चाकण परिसरामध्ये घडला आहे. लग्नाआधी असलेल्या प्रियकराच्या मदतीने मध्यरात्री झोपेत असलेल्या पतीवर धारदार चाकूने गळ्यावर, पोटावर सपासप वार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्याचा (Pune Crime News) प्रयत्न केल्याचा प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी (ता. खेड) येथे समोर घडली आहे. पतीचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला अटक केली आहे.

पतीवरती रूग्णालयात उपचार सुरू

सचिनकुमार उपेंद्र राजभर (वय वर्षे 23, रा. जतपुरा, रोहतास, उत्तर प्रदेश) आणि अंकिता अजय कुमार सिंग (वय 26, रा. सावरदरी, जोंधळजाई मंदिराच्या शेजारी, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अजयकुमार सिंग (वय 28) असे पतीचे नाव आहे. या हल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजयकुमार हे सुरीन अ‍ॅटोमोबाईल कंपनीत नोकरी करतात. त्यांची पत्नी अंकिता हिचे लग्नाच्या आधीपासून सचिनकुमार याच्याशी प्रेमसंबंध (Pune Crime News) होते. हे पती अजयकुमारला माहिती होते. त्याने अंकिताला सचिनकुमार याच्याबरोबर बोलत जाऊ नको, असं सांगितलं होतं. (Pune Crime News)

रात्री साडेबारा वाजता घरात येऊन हल्ला 

मात्र, रविवारी(दि. 16) रात्री जेवण करुन अजयकुमार घरात झोपले होते. त्याचवेळी रात्री उशिरा, रुममध्ये कोणीतरी बोलत असल्याच्या आवाजाने त्यांना जाग आली. रात्री साडेबारा वाजता अजयकुमार झोपलेल्या रुममध्ये अंकिता आणि सचिनकुमार आल्याचे त्याने पाहिले. अजयकुमारने त्यांना जाब विचारला असता अंकिता आणि सचिनकुमार या दोघांनीही अजयकुमार यांना मारहाणीस (Pune Crime News) सुरवात केली.

धारदार सुरी आणत गळ्यावर, पोटावर, छातीवर वार

सचिनकुमारने जोरात अजयकुमारला जमिनीवर ढकलून देत त्याच्या डोक्यात दांडके मारले. त्यानंतर भाजी कापण्याची धारदार सुरी आणत गळ्यावर, पोटावर, छातीवर वार (Pune Crime News) करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अजयकुमारने त्यांच्या ताब्यातून सुटका करत घराबाहेर धाव घेतली. त्याचा आवाज ऐकुन लोक बाहेर आले. लोकांनी खोलीला बाहेरुन कडी लावत अंकिता व सचिनकुमार यांना आतमध्ये कोंडून ठेवलं. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं. अजयकुमारला रुग्णवाहिकेतून संत तुकाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे महाळुंगे पोलिसांनी सांगितले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात मालमत्तांवर ईडीची मोठी छापेमारी, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले; नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन
भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड, नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले
Lata Asha Hospital : लता मंगेशकर हॉस्पिटलचं नाव बदलणार, आशा भोसलेंच्या नावाचाही समावेश, हृदयनाथ मंगेशकरांची मोठी घोषणा
लता मंगेशकर हॉस्पिटलचं नाव बदलणार, आशा भोसलेंच्या नावाचाही समावेश, हृदयनाथ मंगेशकरांची मोठी घोषणा
Pune Crime News: पुण्यातील महिला पतीपासून वेगळी राहायची; तोडगा काढण्याचं भासवत भोंदूबाबानंच केलं धक्कादायक कांड, शेवटी..
पुण्यातील महिला पतीपासून वेगळी राहायची; तोडगा काढण्याचं भासवत भोंदूबाबानंच केलं धक्कादायक कांड, शेवटी..

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Kalyan Crime news: कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
Gold rate Silver price: सोने-चांदीचा भाव वाढला, चांदी 11 हजारांनी महागली, एक तोळा सोन्याचा आजचा भाव?
सोने-चांदीचा भाव वाढला, चांदी 11 हजारांनी महागली, एक तोळा सोन्याचा आजचा भाव?
Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
Raj Thackeray on Babasaheb Ambedkar Jayanti: 'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
Embed widget