एक्स्प्लोर

Pune Crime News: पतीच्या लफड्याचं समजलं; पत्नीने पुण्यातील IT पार्कमधून गर्लफ्रेंडला उचललं, अडीच तास कारमध्ये..., आई अन् भावालाही घेतलं मदतीला

Pune Crime News: पत्नीने आपल्या भावाला व आईला सोबत मदतीला घेऊन थेट प्रेयसीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घडली आहे.

पिंपरी : आपल्या नवऱ्याचं बाहेर एक तरूणीशी संबंध आहेत, याची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने हे सगळं थांबवण्यासाठी चक्क प्रेयसीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध थांबवण्यासाठी पत्नीने आपल्या भावाला व आईला सोबत मदतीला घेऊन थेट प्रेयसीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांत बुधवारी (दि. 21) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

 पिंपरी-चिंचवड आयटी पार्क परिसरात बुधवारी दुपारी थरारक घटना उघडकीस आली. नवऱ्याच्या अनैतिक संबंधांना कंटाळून एका पत्नीने, तिच्या आई आणि भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून एका पुरुषाचे 26 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. ही बाब त्याच्या पत्नीला कळल्यानंतर त्यांच्यात अनेकदा वाद झाले. पती आणि त्याची प्रेयसी भेटत होते, त्यामुळे पत्नीचा संशय अधिक बळावला. पत्नीने गर्लफ्रेंड पासून दूर रहावे अशी पतीला सांगितले होते. मात्र त्याने न ऐकल्याने पत्नीने हे पाऊल उचललं.

'पार्सल द्यायचे आहे' म्हणून बाहेर बोलावले

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ब्रह्मा क्रॉप फेज २, विप्रो सर्कल येथे काम करणाऱ्या महिलेला अज्ञात क्रमांकावरून फोन आला. "तुमचे पार्सल द्यायचे आहे," असे सांगून तिला ऑफिसबाहेर बोलावण्यात आले. बाहेर येताच एका कारमधून आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई उतरल्या. त्यांनी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि तिला ताथवडे व वाकड परिसरात फिरवत मारहाण केली.

'नवऱ्याचा नाद सोडून दे' धमकी

कारमध्ये बसवून घेतल्यानंतर आरोपी पत्नीने पीडितेला धमकी दिली, "माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील." त्यानंतर तिला शिवीगाळ करत चोप दिला गेला.

पोलिस प्रशासनाची तारांबळ

दरम्यान, या अपहरणाची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिलेचे जबरदस्तीने अपहरण होत असल्याचे स्पष्ट दिसले. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. सीसीटीव्हीवरून कारचा क्रमांक मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर वाकड परिसरातून कार ताब्यात घेऊन अपहृत महिलेची सुटका करण्यात आली.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई यांच्याविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. या तिघांनी पोलिसांसमोर चौकशीत कबुली दिली की, "नवऱ्याच्या अनैतिक संबंधांना कंटाळूनच हे कृत्य केले." पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget