Pune Mahanagarapalika Election 2026 candidate Suicide: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात घडामोडींना वेग आला आहे, निवडणुकीला काही दिवसांचा कालावधी राहिलेला असतानाच आणि प्रचार ऐन भरात असतानाच एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सादिक उर्फ बाबू कपूर या 56 वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या कराण्याआधी त्याने हातावर आणि कागदावर सुसाइड नोट लिहिली आहे. ज्यात अनेकांची नावे आहेत. त्यातील एक नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर भागातील उमेदवार फारुख शेख यांचे आहे. सय्यद उर्फ बाबू कपूरने नगर भागातील पाच गुंठे जमिनीच्या वादातून ही आत्महत्या झाली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीवर आधी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाली आहे.

Continues below advertisement

Pune Crime News: एकूण 30 पानांची सुसाईड नोट

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सादिक उर्फ बाबू कपूर (वय 56) याने त्याच्या कार्यालयात आत्महत्या केली. सादिकने मरण्यापूर्वी आपल्या हाताच्या पंजावर मजकूर लिहला होता. तसेच त्याने एकूण 30 पानांची सुसाईड नोट देखील लिहली असून त्यामध्ये आपण आत्महत्या का केली, याचे सविस्तर कारण नमूद करण्यात आले आहे. या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 मधील उमेदवार फारुख शेख यांच्या नावाचाही उल्लेख आहे. पुण्यातील सय्यद नगर भागात पाच गुंठे जमीन होती. यावरुन फारुख शेख आणि सादिक उर्फ बाबू कपूर यांच्यात वाद सुरु होता. त्याच वादातून फारुख शेख यांच्याकडून सादिक यांना त्रास दिला जात होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. मात्र, मरण्यापूर्वी सादिक यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अनेक व्यक्तींची नावं आहेत.  त्यामुळे आता याप्रकरणात पुणे पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, आत्महत्या केलेला सादिक उर्फ बाबू कपूर याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर मकोका कायद्यातंर्गत कारवाई झाली होती. त्यामुळे आता याप्रकरणाच्या तपासातून काय समोर येणार, हे पाहावे लागेल. परंतु, पुणे महानगरपालिका निवडणुकीत हे प्रकरण गाजण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

Pune Crime News: कोण आहेत फारुख शेख? 

आत्महत्या केलेल्या सादिक कपूर यानी आत्महत्या करताना फारुख शेख यांचं नाव हातावर लिहिलं आहे. फारुख शेख हे प्रभाग ३५ मधून अजित पवार गटाचा उमेदवार आहे. माजी नगरसेवक आणि उद्योगपती फारुख शेख हे बिल्डर कॉन्ट्रक्ट घेतात. हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. फारुख शेख हे शेतकरी आहे. विविध देशातील आंब्यांवर प्रयोग करुन ते भारतात पिकवतात, असा दावा करतात. जपानचा आंबा पिकवतो म्हणून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल आहे. सोबतच विविध लहान मोठे गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत कारवाईदेखील त्याच्यांवर झाली आहे.