पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. अशातच पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच हडपसर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक (Pune Crime News) घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर परिसरात प्रभाग क्रमांक ४१ मधील सादिक उर्फ बाबू कपूर (वय ५६) या वक्तीने गळफास (Pune Crime News) घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख शेख जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: नेमकी घटना काय?

सादिक उर्फ बाबू कपूर यांनी त्यांच्या कार्यालयामध्येच आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक यांनी मरण्यापूर्वी आपल्या हाताच्या पंजावर काही नावे लिहिली होती, तसेच घटनास्थळावरून ३० पानांची सविस्तर सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण आणि त्यासाठी कारणीभूत असलेल्या व्यक्तींचा सविस्तर उल्लेख केला आहे.

Pune Crime News: सुसाईड नोटमध्ये काय लिहलंय?

मी आमच्या भागामध्ये माझ्या स्वतःच्या युनिटमध्ये पतसंस्था चालवली आहे. मी गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रीय कार्यक्रम ध्वजारोहणाचा करत आहे. आमचे मंडळींनी इतर सहकाऱ्यांना घेऊन पूरग्रस्तांना मदत तसेच कोरोना काळात अन्नछत्र करून वाटप केले आहे. मी आमच्या कब्रस्तानला गेट नव्हते तिथे मोठे गेट बसून दिले आहे ते गेट बसवताना देखील त्यांची मुले आडवी आली होती. मी शिवसेना शिंदे गटामध्ये शाखाप्रमुख पद घेतले आहे परंतु फारूक इनामदारच्या त्रासामुळे काम जास्त जोमात करू शकलो नाही. माननीय साहेब माझ्या या छोट्याशा कामाचा फारुख इनामदारला भरपूर त्रास झाला आहे आणि त्यांनी माझ्या कायमचा काटा काढण्याचा कट रचून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला खरेदी करून माझ्यावर खोटे केसेस टाकून मला कायमचे संपवण्याचा प्लॅन केला आहे आणि पुढे केसेस ही तयार ठेवले आहेत.

फारुख यासीन इनामदार हा टिपू टोळी पठाण टोळीचा आका आहे. तो अजित पवार साहेबांच्या नावाखाली आजच्या काळात गोर-गरिबांच्या जमिनी लाटण्याचे काम करत आहे. त्याने गोरगरीब लोकांचे जगणे मुश्कील करुन टाकले आहे. त्याने घरं-कुटुंब उद्ध्वस्त करुन सोडली आहेत. साहेब माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला  आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे आणि माझी 10 कोटीची जमीन हडप करण्याच्या तयारीत आहे. साहेब त्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खरेदी केले आहे. फारुख यासीन जामदार, जहुर मोहम्मद सय्यद, अॅड कबीर शेख, पोलीस अधिकारी धनाजी टोणे, डॉ. राजकुमार शिंदे, हॅरी स्वामी या मुख्य आरोपींनी फाशीची शिक्षा अपेक्षित आहे, असंही त्यांनी त्यांच्या एका नोटमध्ये लिहलं आहे.

Pune Crime News: कपूरने १ जानेवारीला प्रशांत जगताप यांना लिहिलं होतं पत्र 

आत्महत्या केलेला सादिक कपूर याने १ जानेवारीला प्रशांत जगताप यांना पत्र लिहिलं होत त्यात फारुख इनामदार हा टिपू पठाण याचा अक्का आहे, असं लिहिलं आहे. सत्ताधाऱ्यांची या फारुखला साथ आहे असंही पत्रात लिहलं आहे. त्यावर प्रशांत जगताप यांनी हळहळ व्यक्त केली आहे आणि सोबतच या सगळ्या प्रकरणासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. फारुख इनामदार हे अजित पर गटाचे उमेदवार आहेत, त्यांच्या पक्षातल्या लोकांनी जर अशा लोकांना साथ दिली असेल तर मी याच्या विरोधात लढणार. आपल्यामुळे एखादा कार्यकर्ता जर असा जीव देत असेल तर हे अत्यंत वाईट आहे अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे. एक जानेवारीला हे लेटर प्रशांत जगताप यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं. काल रात्री हे लेटर प्रशांत जगताप यांनी वाचलं. त्यानंतर सादिक कपूर यांनी आत्महत्या केल्याचा प्रशांत जगताप यांना कळलं. जर दोन दिवसाआधीच हे पत्र मी वाचलं असतं तर मी कपूर याला वाचवू शकलो असतो असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले. निवडणूक झाल्यावर या कपूर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार आणि त्यासाठी हायकोर्टात देखील जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.