पुणे: शिवाजीनगर पोलीस लाईनमधील निवासी आणि खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सचिन हरीश्चंद्र सुर्वे (वय अंदाजे 40 वर्षे) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी (दि. 6 जून) दुपारी ही घटना घडली असून, यामुळे पुणे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.(Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन सुर्वे हे शिवाजीनगर येथे पोलीस वसाहतीतील नवीन बिल्डिंग मध्ये राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलगी गावी गेले होते, त्यामुळे ते एकटेच घरी असल्याची माहिती समोर आली आहे. सुर्वे यांनी काल (शुक्रवारी) दुपारी गळफास घेतल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुर्वे यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी सुर्वे यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली आहे. सुर्वे यांची मुलगी दहावीमध्ये शिकत आहे. या घटनेने त्यांच्या कुटूंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुर्वे यांची कोंढवा येथे बदली झाली असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी परिसरात चर्चा आहे.

पत्नी-मुलगी गावी; घरी एकटे असताना उचललं टोकाचं पाऊल

सचिन सुर्वे हे शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील नव्या इमारतीत राहत होते. सध्या त्यांची पत्नी आणि मुलगी गावी गेलेले असल्याने ते घरात एकटेच होते. शुक्रवारी दुपारी त्यांनी गळफास घेतल्याचे उघड झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

सुर्वे यांची नुकतीच कोंढवा पोलीस ठाण्यात बदली झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बदलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का

सुर्वे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची दहावीत शिकणारी मुलगी आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनाही या घटनेचा धक्का बसला असून, पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. सचिन सुर्वे यांच्या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे आणि कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.