एक्स्प्लोर

Pune Crime News: बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा

Pune Crime News: पोलिसांनी राबवलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये पुन्हा एकदा ११ बांगलादेशी महिला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठेतील रेड लाइट परिसरात पुणे पोलिसांनी काल रात्री छापेमारी करत कुंटणखान्यांमध्ये असलेल्या महिलांची पडताळणी केली. या कारवाई दरम्यान वेश्याव्यवसाय (Pune Crime News) करत असलेल्या ११ महिला बांगलादेशी असल्याचे त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीतून (Pune Crime News) उघड झाले. यानंतर पोलिसांनी संबंधित महिलांवर तसेच कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुण्यातील रेड लाइट (Pune Crime News) परिसरात यापूर्वीही बांगलादेशी महिलांना आणल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी राबवलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये पुन्हा एकदा ११ बांगलादेशी महिला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.(Pune Crime News)

फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडक पोलिसांकडून कारवाई

पुण्यातील बुधवार पेठेत झालेल्या कारवाईचा पोलिस आयुक्तांकडून आढावा घेण्यात आला आहे. अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांवर कारवाईचा आढावा घेण्यासाठी स्वतः पोलिस आयुक्त रस्त्यावर उतरले. स्वतः पोलिस आयुक्त फरासखाना पोलिस ठाण्यात पोहचले. पुण्यातील बुधवार पेठेतून ११ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.(Pune Crime News)

११ बांगलादेशी महिला सापडल्या

या घटनेप्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, मी सुरुवातीला म्हणालो होतो बुधवार पेठेत बेकायदेशीर हालचाली आहेत, त्यावर कारवाई केली जाणार सांगितले होते. त्यानुसार आम्ही काल रात्री पुन्हा कारवाई केली. काल रात्री कारवाई करण्यात आली, यात ११ बांगलादेशी महिला सापडल्या. एकूण २२ महिलांना आम्ही ताब्यात घेतलं आहे. बुधवार पेठ परिसरात अश्या हालचालींना मदत करणाऱ्या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. जे जे बेकायदेशीर आहे, सर्व इमारतींची तपासणी करून कारवाई केली जाईल. पोलीस दलाची सुरू असलेली कायदेशीर कारवाई गरज पडल्यास आणखी वाढवू. बुधवार पेठेत महिला आणणाऱ्या दलालांवर कारवाई केली जाणार आहे. पिटा कायद्यांतर्गत करवाई सुरु आहे. जी कारवाई सुरू आहे, ती नियमांच्या अधीन राहून सुरू आहे, अशी माहिती देखील पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

भारती विद्यापीठ परिसरातील महिलेचा खून प्रकरणात माहिती देताना म्हणाले...

भारती विद्यापीठ परिसरातील महिलेचा खून प्रकरणात सामूहिक बलात्काराची घटना नाही. एक मृतदेह सापडला होता, देहविक्री करणारी महिला त्यांच्यासोबत गेल्याचे दिसून आलेले आहे. ६ आरोपी आमच्या ताब्यात आहेत, बलात्काराची कुठलीही घटना समोर आलेली नाही. हा फक्त मर्डरचा गुन्हा आहे, असंही पोलिस आयुक्तांनी म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत

Embed widget