एक्स्प्लोर

Pune News: पुण्यातील बिल्डर बंधूंचा प्रताप, बंगल्यासमोरील गरिबांच्या हातगाड्या नकोशा, कोरेगाव पार्कमध्ये एका रात्रीत 'अख्खं गार्डन' उगवलं

Pune Crime news: पुण्यातील धनाढ्य बिल्डरने त्याच्या बंगल्यासमोरील कष्टकऱ्यांच्या हातगाड्या हटवून त्याठिकाणी एका रात्रीत गार्डन उभे केले आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Pune Crime news: पुण्यातील कोरेगाव पार्क भागात एक चमत्कार घडला आहे. रस्त्याच्या कडेला रातोरात एक गार्डन तयार झालं असून त्या गार्डनमध्ये (Garden) रात्रीत मोठी झाडं आणि हिरवगार गवत देखील उगवून आले आहे. या चमत्काराची महापालिकेच्या (Pune Mahangarpalika) अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून हे असं रातोरात गार्डन कसं तयार झालं याची माहिती घेतली जात आहे. (Pune Lates News)

कोरेगाव पार्क मधील लेन नंबर तीनमध्ये अनेक बड्या उद्योगपतींचे बंगले आहेत. ज्यामध्ये बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया आणि त्यांचे बंधू सागर चोरडिया यांच्या बंगल्याचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात सागर चोरडिया यांच्या मुलीचे लग्न होते. अनेक व्हीआयपी त्यासाठी चोरडिया यांच्या बंगल्यात येणार होते. मात्र, कोरेगाव पार्कच्या या रस्त्यावर कष्टकऱ्यांची भुक भागवणारे चार हातगाड्या होत्या. अगदी कमी किंमतीत या ठिकाणी खाद्यपदार्थ विकले जात होते. या हातगाडी चालकांकडे महापालिकेचे लायसन्स होते आणि महापालिकेने तो भाग हॉकर झोन म्हणून जाहीर केल्याची पाटी देखील या ठिकाणी आहे. मात्र, चोरडिया यांच्या आलिशान घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर या हातगाड्या डोळ्यांना खुपत असल्याने त्या हटवण्यात आल्या. त्या पुन्हा आपल्या जागी येऊ नयेत, यासाठी चोरडिया यांच्याकडून रातोरात रस्त्याच्या कडेला हे गार्डन उभारण्यात आले. 

याबाबत आम्ही चोरडिया यांची बाजू जाणून घेण्यासाठी दोन दिवस प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. सागर चोरडिया आणि अतुल चोरडिया यांच्याशी आम्ही फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र, फोन उचलला गेला नाही. चोरडिया यांच्या पंचशील ग्रुपच्या माध्यम समन्वयक सुरभी गुप्ता यांच्याशी फोनवरून संपर्क करून त्यांना आम्ही या विषयाची माहिती दिली, त्याचबरोबर हा विषय लेखी स्वरूपात सविस्तर त्यांना पाठविण्यात आला. मात्र त्यांच्याकडून त्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही.

याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला. मात्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हे गार्डन हटविण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाची असल्याच सांगितले. अतिक्रमण विभागाने ही जबाबदारी गार्डन विभागाची असल्याचे सांगितलं तर गार्डन विभागाने हे गार्डन आम्ही उभारलेले नाही. त्यामुळे ते हटवण्याची जबाबदारी आमची नसल्याचे म्हटले. मात्र, यापैकी एकही अधिकारी एबीपी माझाच्या प्रतिनिधींना कार्यालयात भेटला नाही.

आणखी वाचा

नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget