पुणे : पुण्यात आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने खून (Pune Crime News) केल्याची घटना काळेपडळ येथे घडली आहे.  याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह सहा जणांना अटक केली आहे. प्रेमसंबंध तोडण्यासाठी तरुणीच्या आईच्या प्रियकराने (Pune Crime News) टाकलेला दबाव आणि त्याने दिलेल्या धमकीमुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. खून केल्याप्रकरणी तरुणीच्या प्रियकरासह साथीदारांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला प्रियकर हा सराईत गुन्हेगार आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: ३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बिरादार यांचा खून 

या प्रकरणी दुर्वांग ऊर्फ पारस सुनील मानकर (वय २१, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता), पारस किशोर गायकवाड (वय २१, रा. दत्तवाडी, सिंहगड रस्ता), अभिजित उर्फ अभी संजय इंगळे (वय २२), सोमनाथ रमेश दोरकर (वय २१), साहिल सागर शेलार (वय २४, सर्व रा. हडपसर), चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांना अटक करण्यात आली. गणेश संजू बिरादार (वय २५, रा. ससाणेनगर, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. ३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बिरादार यांचा खून झाला होता. याबाबत बिरादार याच्या पत्नीने फिर्याद दिली होती. अधिक तपास काळेपडळ पोलिस करत आहेत.(Pune Crime News)

Pune Crime News:  नेमकं काय घडलं?

पुण्यात भरचौकात एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली होती. या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना यश आलं. आईच्या बॉयफ्रेंडने प्रेमसंबंध तोडण्यासाठी दबाव टाकल्याने आणि धमकी दिल्यामुळे मुलीच्या प्रियकराने त्याची हत्या केली. पुण्यातील हडपसरमधील काळेपडळ परिसरात ३ मे रोजी ही घटना घडली होती. या हत्याकांडाप्रकरणी सराईत गुन्हेगारासह ६ जणांना पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बिरादार (२५ वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. गणेश हडपसर येथील ससाणेनगरमध्ये राहायचा. तो विवाहित होता. त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो ज्या महिलेवर प्रेम करत होता त्या महिलेच्या मुलीचे सराईत गुन्हेगार दुर्वांग उर्फ पारस मानकर (२१ वर्षे) या तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत. दुर्वांग पुण्यातील टिळक रस्ता येथे राहतो. गणेशने आपल्या गर्लफ्रेंडच्या मुलीला दुर्वांगसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. प्रमेसंबंध तोडण्यासाठी गणेशकडून सतत दबाव टाकला जात होता आणि धमक्या दिल्या जात होत्या. यामुळे दुर्वांग संतापला होता.