पुणे: पुण्यातील येरवडा परिसरातील एस.एल. एन्टरप्रायजेस या जॉकी कंपनीच्या कपड्यांच्या दुकानातून लेडीज व जेन्ट्स अंडरगार्मेंट्स, टी-शर्ट्स, नाईट पॅंट्सची चोरी करणाऱ्या एकाला येरवडा तपास पथकाडून अटक करण्यात आली आहे. जून 2024 पासून या ठिकाणावरून वस्तू चोरी झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. याबाबत येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, या सराईत चोराला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. सात लाखांचे जेन्ट्स आणि लेडीज गारमेंन्ट्स, टि शर्ट, नाईट पॅन्ट जप्त करण्यात आले आहेत.
पुण्यातील कापड दुकानांतून अंडरगारमेंट्सची चोरी करणाऱ्या चोरट्यास येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल सात लाखांचे जेन्ट्स आणि लेडीज गारमेंन्ट्ससह इतर कपडे जप्त करण्यात आले आहेत. गणपत मांगीलाल डांगी (वय 44, रा. विठ्ठल नगर, सिंहगड रोड) असं अटक करण्यात आलेल्या चोराचं नाव आहे. येरवडा पोलीस ठाण्यात आठ लाखांचे लेडीज व जेन्टस अंडरगार्मेंट चोरी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगरमधील एस.एल.एन्टरप्रायजेस नावाच्या एका प्रसिद्ध ब्रँडच्या कपड्याच्या दुकानात अंडरगारमेंट्सची चोरी करणारा कल्याणीनगर भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हालचाली सुरु केल्या. पोलिसांना बघून आरोपी पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं. त्याची चौकशी केली. येरवडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपी असल्याचे तपासात समोर आलं आहे. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मालापैकी 7 लाख 30 हजारांचे लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, नाईट पॅन्ट जप्त करण्यात आले आहेत. चौकशीमध्ये त्याने त्याचा गुन्हा कबुल केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या मालापैकी 7 लाख 30 हजार रुपये किमतीचे लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, नाईट पॅन्ट जप्त करण्यात आले आहेत.
चौकशीत केलं कबूल
कापड दुकानांतून अंडरगारमेंट्सची चोरी करणाऱ्या चोरट्यास येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका प्रसिद्ध ब्रँडच्या कपड्याच्या दुकानात अंडरगारमेंट्सची चोरी करणारा कल्याणीनगर भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हालचाली सुरु केल्या. पोलिसांना बघून आरोपी पळून जात असतानाच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं. त्याची चौकशी केली. येरवडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपी असल्याचे तपासात समोर आलं आहे. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मालापैकी 7 लाख 30 हजारांचे लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, नाईट पॅन्ट जप्त करण्यात आले आहेत. चौकशीमध्ये त्याने त्याचा गुन्हा कबुल केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.