पुणे : पुण्यात (Pune Crime News) गुन्हेगारीच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येतात. मात्र याच उपाययोजना आणि पोलिसांच्या सूचना अनेकदा धुळीत मिळवत (Pune News) असल्याचं समोर येतं. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. हातगाडी लावण्यावरुन झालेल्या वादात महिलेला मारहाण करुन तिच्या पतीच्या डोक्यात वडा पाव तळण्याची कढई मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी 28 वर्षीय महिला दिपाली गणेश मगर यांनी पुण्यात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सिद्धार्थ साळुंखे, संग्राम साळुंखे, उत्तरा साळुंखे (रा. सदाशिव पेठ) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हत्ती गणपती चौकातील ज्ञान प्रबोधिनीच्या बाजूला गणेशचतुर्थीच्या दिवशी हा प्रकार घडला. दुपारी साडे चार वाजता हा प्रकार घडल्याने काही वेळ परिसरात खळबळ उडाली होती. 


पाठीमागून येऊन वडा पाव तळण्याची कढई घातली


अधिक माहितीनुसार, महिला मागील काही वर्ष ज्ञान प्रबोधिनीसमोरील बाजूला हातगाडीवर खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, त्या काल (20 सप्टेंबर) पुन्हा याच ठिकाणी आपली हातगाडी लावण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी काही दिवसांपासून आपली हातगाडी लावणारी महिलादेखील तिथेच होती. त्यानंतर तक्रारदार महिला आणि दुसरी हातगाडी लावणारी महिला यांच्यात वाद निर्माण झाला. एकमेकींना शिवीगाळ केली. तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला मारहाण केली. पतीच्या डोक्यात पाठीमागून येऊन वडा पाव तळण्याची कढई मारुन गंभीर जखमी केलं. पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आता पोलीस तपासणी करत आहे. गणेशोत्सवादरम्यान पुण्यात अनेक लहान मोठे विक्रेते येत असतात. त्यांच्याच अनेकदा वादावादी होत असते. किरकोळ हाणामारी झाल्याचे प्रकरणंदेखील घडतात. आता मात्र थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 


हाणामारीच्या आणि लुटमारीच्या घटनेत वाढ


पुण्यात मागील काही दिवसांपासून बाकी गुन्ह्यांसोबतच किरकोळ वादातून हाणामारीच्या आणि लुटमारीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांवर आळा घालणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. पुण्यातील अनेक परिसरात गुन्हेगारांची धुमाकूळ घातला आहे. किरोकोळ कारणावरुन हाणामारी, पूर्ववैमस्यातून हत्येच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यातच रोज पुण्यातील वर्दळीच्या परिसरातून लुटमारीच्या घटनांनी पुणेकर त्रस्त असल्याचं चित्र आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Pune Ganeshotsav 2023 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरासमोर अथर्वशीर्ष पठणात परदेशी पाहुणे तल्लीन