पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणेंच्या सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Pune Crime News) केल्याच्या घटनेची राज्यभरात चर्चा सुरू आहे, अशातच बारामतीतील बांदलवाडी येथील एकाने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Pune Crime News) घेऊन तिला धारदार हत्याराने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलेचा ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या बहिणीने बारामती पोलिसात ( Baramati Police) फिर्याद दिली असून पोलिसांनी (Baramati Police) लहू रामा वायकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संजना लहू वायकर असं या मृत्यू झालेल्या चाळीस वर्षीय महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News) 

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पती पत्नीच्या चारित्र्यावर (Crime News) संशय घ्यायचा. या कारणामुळे वाद होत होते. संशयाचं भूत मानगुटीवर बसलेल्या नवऱ्याने पत्नीला धारदार हत्याराने मारहाण केली. ही घटना बारामती तालुक्यातील बांदलवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात आरोपी लहू रामा वायकर वय 48 वर्ष, रा. बांदलवाडी, ता. बारामती, जि.पुणे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतची फिर्याद मयत महिलेच्या बहिणीने बारामती पोलिसात दिली आहे. ही घटना दि.25 मे रोजी घडली आहे. (Pune Crime News)            बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.25 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बांदलवाडी संजना लहु वायकर वय 40 वर्षे, रा. बांदलवाडी ता बारामती जि. पुणे हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत पतीने धारधार शस्त्राने तिच्या डोक्यात, कपाळावर, तसेच तिच्या चेहऱ्यावर मारून तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करुन गंभीर जखमी केले. दरम्यान जखमीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

पतीने संजना वायकरवरती केलेल्या हल्ल्यात संजनाच्या डोक्यात, कपाळावर आणि चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले.जखमी अवस्थेत संजनाला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत लहू वायकर याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.