पुणे:पुणे शहरातील कोंढवा परिसरातील धक्कादायक घटनेने राज्य पुन्हा हादरलं आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार (Pune Crime News) केला. विशेष म्हणजे, आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढून "मी पुन्हा येईन" असा मेसेज ठेवून ठेवला होता. कोंढव्यातील एका गार्डेड सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय (Pune Crime News) असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला “कुरिअर आलं आहे” असं सांगितलं. महिलेने “हे कुरिअर माझं नाही” असं स्पष्ट सांगून नकार दिला. मात्र आरोपीने “सही करावी लागेल” असा आग्रह धरला. त्यामुळे महिलेला सेफ्टी डोअर उघडावा लागला. त्याच क्षणी आरोपीने तिच्या तोंडावर एखादा केमिकल स्प्रे (Pune Crime News) मारला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेच्या मोबाईलमधून त्याने स्वतःचा सेल्फी काढला. त्याचबरोबर 'मी पुन्हा येईन' असा मजकूर देखील टाईप करून ठेवला. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. मात्र अद्याप आरोपी मोकाट असल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.(Pune Crime News)
फ्लॅटचा सेफ्टी डोअर उघडल्यानंतर...
घटनेतील आरोपी तब्बल 30 तासानंतर देखील मोकाट आहे. पुण्यातील कोंढव्यात कुरियर बॉयचा बनाव करून त्याने घरात प्रवेश केला. फ्लॅटचा सेफ्टी डोअर उघडल्यानंतर त्याने तरुणीच्या तोंडावरती केमिकल स्प्रे मारून घरात घुसला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपी 30 तासानंतरही मोकाट असल्याने सुरक्षेबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पोलिसांची दहा पथक या आरोपीचा शोध घेत आहेत. काल पोलिसांनी दोन संशय व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. या संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा उलगडा होणं बाकी आहे. तरुणीने तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावा केला आहे, त्या तरुणीकडून देखील पोलीस वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती गोळा केली जात आहे. ही घटना ज्या पद्धतीने घडली असा जा तरुणीने दावा आहे त्या सर्व बाबींची खातरजमा केली जात आहे. त्या सोसायटीमधले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्याचबरोबर तरुणीचा भाऊ दुसऱ्या गावाला गेलेला आहे, याची देखील माहिती घेतली जात आहे. या सर्व प्रकरणाचा तपास दोन्ही बाजूंनी सुरू आहे. या प्रकरणातील संशयीताला पकडण्यासाठी 10 पथके तपास करत आहेत, त्याचबरोबर ज्या तरुणीने अत्याचार केल्याचा दावा केलेला आहे तिच्याकडून देखील तपास सुरू आहे.
पोलिसांनी कोणती माहिती दिली?
या घटनेबाबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी माहिती देताना सांगितलं की,कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केला. कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेच कुरिअर आहे असे सांगितलं, त्यानंतर जबरदस्तीने घरात शिरून तिच्यावरती बलात्कार केला. (Pune Crime news) पोलिसांच्या 10 टीम त्याचा तपास करत आहे. तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहते. तरुणी मूळची अकोल्याची आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीत काम करते अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान आरोपीने सोसायटीमध्ये जाण्यासाठी स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगितले होते. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेच कुरिअर आहे असे सांगितलं होतं, मात्र तरूणीने ते आपलं नसल्याचं सांगितलं, पण त्याने त्यावर सही करावी लागेल असं सांगितल्याने तरूणीने सेफ्टी डोअर उघडला आणि त्याचा फायदा नराधम आरोपीने घेतला. (Pune Crime news)
