एक्स्प्लोर

Pune Crime News: सही करावी लागेल; कोंढव्यामध्ये कुरिअर बॉयचा बनाव अन् तोंडावर केमिकल स्प्रे मारून तरुणीच्या अत्याचार; 30 तासानंतरही आरोपी मोकाट, नेमकं काय घडलं?

Pune Crime News: सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. मात्र अद्याप आरोपी मोकाट असल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

पुणे: पुणे शहरातील कोंढवा परिसरातील धक्कादायक घटनेने राज्य पुन्हा हादरलं आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार (Pune Crime News) केला. विशेष म्हणजे, आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढून "मी पुन्हा येईन" असा मेसेज ठेवून ठेवला होता. कोंढव्यातील एका गार्डेड सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय (Pune Crime News) असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला “कुरिअर आलं आहे” असं सांगितलं. महिलेने “हे कुरिअर माझं नाही” असं स्पष्ट सांगून नकार दिला. मात्र आरोपीने “सही करावी लागेल” असा आग्रह धरला. त्यामुळे महिलेला सेफ्टी डोअर उघडावा लागला. त्याच क्षणी आरोपीने तिच्या तोंडावर एखादा केमिकल स्प्रे (Pune Crime News) मारला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेच्या मोबाईलमधून त्याने स्वतःचा सेल्फी काढला. त्याचबरोबर 'मी पुन्हा येईन' असा मजकूर देखील टाईप करून ठेवला. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. मात्र अद्याप आरोपी मोकाट असल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.(Pune Crime News) 

फ्लॅटचा सेफ्टी डोअर उघडल्यानंतर...

घटनेतील आरोपी तब्बल 30 तासानंतर देखील मोकाट आहे. पुण्यातील कोंढव्यात कुरियर बॉयचा बनाव करून त्याने घरात प्रवेश केला. फ्लॅटचा सेफ्टी डोअर उघडल्यानंतर त्याने तरुणीच्या तोंडावरती केमिकल स्प्रे मारून घरात घुसला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपी 30 तासानंतरही मोकाट असल्याने सुरक्षेबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पोलिसांची दहा पथक या आरोपीचा शोध घेत आहेत. काल पोलिसांनी दोन संशय व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. या संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा उलगडा होणं बाकी आहे. तरुणीने तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावा केला आहे, त्या तरुणीकडून देखील पोलीस वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती गोळा केली जात आहे. ही घटना ज्या पद्धतीने घडली असा जा तरुणीने दावा आहे त्या सर्व बाबींची खातरजमा केली जात आहे. त्या सोसायटीमधले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्याचबरोबर तरुणीचा भाऊ दुसऱ्या गावाला गेलेला आहे, याची देखील माहिती घेतली जात आहे. या सर्व प्रकरणाचा तपास दोन्ही बाजूंनी सुरू आहे. या प्रकरणातील संशयीताला पकडण्यासाठी 10 पथके तपास करत आहेत, त्याचबरोबर ज्या तरुणीने अत्याचार केल्याचा दावा केलेला आहे तिच्याकडून देखील तपास सुरू आहे.

पोलिसांनी कोणती माहिती दिली?

या घटनेबाबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी माहिती देताना सांगितलं की,कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केला. कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेच कुरिअर आहे असे सांगितलं, त्यानंतर जबरदस्तीने घरात शिरून तिच्यावरती बलात्कार केला. (Pune Crime news) पोलिसांच्या 10 टीम त्याचा तपास करत आहे. तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहते. तरुणी मूळची अकोल्याची आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीत काम करते अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान आरोपीने सोसायटीमध्ये जाण्यासाठी स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगितले होते. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेच कुरिअर आहे असे सांगितलं होतं, मात्र तरूणीने ते आपलं नसल्याचं सांगितलं, पण त्याने त्यावर सही करावी लागेल असं सांगितल्याने तरूणीने सेफ्टी डोअर उघडला आणि त्याचा फायदा नराधम आरोपीने घेतला. (Pune Crime news)

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
Sunetra Pawar on Finance Ministry: अर्थ खातं कोणाकडे? प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; म्हणाल्या...
अर्थ खातं कोणाकडे? प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; म्हणाल्या...
Pune News: पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या कार्यक्रमात गोंधळ; शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की; नियोजनाचा कलाकारांना फटका
पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या कार्यक्रमात गोंधळ; शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की; नियोजनाचा कलाकारांना फटका
Rain Updates: पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Embed widget