पिंपरी चिंचवड: तुम्ही आमचे बांधकाम पाडले तर मी माझ्या बाळाला खाली फेकून देईल आणि मी सुद्धा आत्महत्या करेल. पिंपरी चिंचवडमधील सांगवीत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण  विरोधी पथका समोर 3 वर्षाचा मुलगा इमारतीवरून खाली टाकण्याच्या उद्देशाने धमकी देत शिवीगाळ केली या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अनधिकृत बांधकाम पडणारे अधिकारी, कर्मचारी सांगवी भागात कारवाई करण्यासाठी गेले असता, लाड कुटुंबातील सदस्य 3 वर्षाच बाळ खाली फेकून देण्याची धमकी देत होता.

Continues below advertisement

लहान मुल जाळी मधून खाली टाकण्याची धमकी

राजाराम लाड आणि निलेश लाड यांनी सांगवी भागात अनधिकृत बांधकाम केले होते. ते बांधकाम पाडण्यासाठी पथक गेले असता तुम्ही आमचे बांधकाम पाडले तर मी माझ्या बाळाला खाली फेकून देईल व मी सुद्धा आत्महत्या करेल अशी धमकी दिली. आपल्या 3 वर्ष वयोगटातील लहान मुल जाळी मधून खाली टाकण्याची धमकी देत बांधकाम पाडण्यासाठी अडथळा निर्माण करत, पथकाला शिवीगाळ गेली. राजाराम लाड आणि निलेश लाड यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 132,352,351 अंतर्गत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राजाराम लाड,निलेश लाड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच राजाराम आणि निलेश लाड हे फरार झाले आहेत, सांगवी पोलीस आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस स्टेशनमध्ये पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील उप अभियंता श्याम गर्जे यांनी फिर्याद दिली ते जेव्हा अतिक्रमणाची कारवाई करण्यासाठी गेले तेथील घर मालक राजाराम लाड आणि निलेश लाड यांनी जर तुम्ही आमचं घर पाडलं तर बाळाला खाली फेकून देऊ, आत्महत्या करू अशी धमकी दिल्याची आणि सरकारी कामात व्यत्यय आणल्याची तक्रार त्यांनी दिली, त्यावरून सांगवी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे आरोपीचा शोध सुरू आहे.

Continues below advertisement