एक्स्प्लोर

Pune Crime News: बायकोचं अफेअर माहिती असूनही कार घेतली, तीन लाख रूपये खर्चाला दिले, जीव घेण्याइतकं काय बिनसलं? लोणी काळभोरच्या घटनेनं पुणे हादरलं

Pune Crime News: पहाटेच्या सुमारास त्यांच्या डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

पुणे: पुण्यातील लोणी काळभोर परिसरामध्ये अनैतिक संबंधाना (Pune Crime News) अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या साथीने खून केला. रवींद्र काशीनाथ काळभोर (वय 45, रा. रायवाडी रोड, वडाळेवस्ती, लोणी काळभोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रवींद्र झोपेत असतानाच मध्यरात्री डोक्यात फावड्याच्या दांडक्याने जोरात वार करून त्यांचा खून करण्यात आला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत गुन्ह्याचा छडा लावत शोभा रवींद्र काळभोर (वय 42), गोरख त्रिंबक काळभोर (वय 41, रा. वडाळेवस्ती, लोणी काळभोर) या दोघांना अटक केली. ही घटना सोमवारी (दि. 11) मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घडली आहे.(Pune Crime News) 

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गोरख आणि शोभा या दोघांचे अनैतिक संबंध होते. रवींद्र यांना याबाबत माहिती होती. त्यातूनच पती रवींद्र आणि पत्नी शोभा या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दारू पिऊन रवींद्र सतत शोभाला मारहाण करत होता. त्यामुळे गोरखचा देखील रवींद्रवरती राग होता. शनिवारी (दि. 29) शोभा आणि रवींद्र या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्या वेळी शोभा आपल्या मुलांना घेऊन माहेरी थेऊरला गावी निघून गेली. रवींद्रकडून सतत होणाऱ्या त्रासाला शोभा देखील कंटाळली होती. त्यामुळे प्रियकर गोरख आणि शोभा या दोघांनी रवींद्रला संपवायचं ठरवलं.

 दोघांनी एकत्र चारचाकी गाडी घेतलेली

रवींद्र आणि गोरख एकाच गावाचे राहणारे. दोघांच्या घरामध्ये फक्त  शंभर मीटरचे अंतर होतं, तर शेतीचा बांधाला बांध होता. गोरखचं रवींद्र यांच्या घरी कायमच येणं-जाणं असायचं. दोघांनी एकत्र चारचाकी गाडी देखील खरेदी केली आहे. तर गोरख याने साडेतीन लाख रुपये रवींद्र यांना दिले होते. रवींद्र यांना दारूचे व्यसन होते. अनेकदा गोरख त्यांना दारू पाजत असे. त्या रात्री देखील शोभा थेऊरला गेल्यामुळे रवींद्र सोमवारी (दि.31) एकटेच घरी होते. त्या दिवशी त्यांनी मद्य प्राशन केले होते. गोरख हा त्यांच्यासाठी जेवण घेऊन आला. त्यानंतर रवींद्र अकराच्या सुमारास रवींद्र घराबाहेर झोपले, मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास गोरख त्यांच्या घरी आला. त्याने रवींद्र झोपेत असताना डोक्यात फावड्याच्या दांडक्याने वार केले. घाव वर्मी लागल्याने रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गोरख याने घटनास्थळावरून पळ काढला होता.

शोभा आणि गोरख या दोघांचे कॉल

मंगळवारी (दि. 1) सकाळी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, रायवाडी रोड वडाळेवस्ती येथे रवींद्र काळभोर हे रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडले आहेत. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी रवींद्र हे त्यांच्या घरासमोर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. उपचारासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. रवींद्र यांचा खून झाला होता. 

त्यानुसार पोलिसांनी तपासाची तपास सुरू केला. त्या वेळी त्यांची पत्नी शोभा आणि गावातील व्यक्ती गोरख या दोघांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना दुवे जोडले. रवींद्र यांचा खून ज्या दिवशी झाला त्या दिवशी रात्री 9 वाजता आणि मध्यरात्री दोन वाजल्यानंतर शोभा आणि गोरख या दोघांचे कॉल झाल्याचे तांत्रिक विश्लेषणात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Petrol Diesel gas shortage: पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
Vishwas Patil : ‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
Pune Crime News : तू खूप सुंदर दिसतेस म्हणत हात पकडला अन्....; डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; शिवाजीनगर परिसरातील संतापजनक घटना
तू खूप सुंदर दिसतेस म्हणत हात पकडला अन्....; डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील संतापजनक घटना
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
Accident News : पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Pune Petrol Diesel gas shortage: पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Embed widget