पुणे :  पुण्यातील उरुळी परिसरामध्ये पतीकडून क्रौर्याचा कळस गाठल्याची संतापजनक (Pune Crime News) घटनेची माहिती समोर आली आहे. पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकून १५ दिवस घरात कोंडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत ‘फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही’ या विकृत मानसिकतेतून एका पतीने २४ वर्षीय पत्नीला अमानुष मारहाण (Pune Crime News) करून तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन (ता. हवेली) येथे उघडकीस आली. क्रौर्याचा कळस म्हणजे या कृत्यानंतर आरोपीने पीडितेला रुग्णालयात न नेता तब्बल १५ दिवस घरातच डांबून ठेवले होते.  याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.(Pune Crime News)

Pune Crime News : ॲसिडची बाटली आणून तिच्या गुप्तांगावर ओतले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना २० एप्रिल रोजी घडली आहे. पीडितेचा पती दारू पिऊन घरी आला आणि ‘तू कामावर जातेस, तुझे बाहेर कोणाशी अनैतिक संबंध आहेत ते सांग,’ असे म्हणत त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर धमकी देत त्याने ॲसिडची बाटली आणून तिच्या गुप्तांगावर ओतले. असह्य वेदनेने महिला जिवाच्या आकांताने ओरडत होती. तिने घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधमाने घराचा दरवाजा आतून बंद करून तिला पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडितेचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या तिच्या जावेने सासू-सासऱ्यांना फोन करून बोलावले. मात्र, तोपर्यंत आरोपीने याबद्दल कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत घरातून पळ काढला.(Pune Crime News)

Pune Crime News : आपल्या दोन्ही मुलींना सोबत घेतले आणि थेट माहेर गाठले

अखेर, शनिवारी (ता. ९) पती कामावर गेल्याची संधी साधून, पीडितेने आपल्या दोन्ही मुलींना सोबत घेतले आणि थेट माहेर गाठले. तिथे तिने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. या घटनेने हादरलेल्या नातेवाईकांनी तिला उरुळी कांचन पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेला तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर पीडितेने शुक्रवारी (ता. १५) तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.(Pune Crime News)

या अमानुष प्रकारामुळे उरुळी कांचन परिसरात संतापाची लाट उसळली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केवळ मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आणि चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर केलेल्या अत्याचाराने मानवतेलाच काळीमा फासला आहे. जखमी अवस्थेत तब्बल १५ दिवस महिलेला घरात डांबून ठेवण्यात आल्याने आरोपीच्या क्रौर्याची परिसीमा समोर आली आहे. पीडित महिलेने मोठ्या धैर्याने घरातून बाहेर पडत पोलिसांत धाव घेतल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, या घटनेनंतर महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.