पिंपरी: पुण्यामधून एक अत्यंत भयंकर आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे, जिथे रक्ताच्या नात्यांनीच विश्वासाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. मिळकतीमधील हिस्सा देत नसल्याच्या रागातून एका सावत्र नातवाने आपल्या ६० वर्षीय आजीची चाकूने सपासप वार करून निर्घृण (Pune Crime News) हत्या केली. विशेष म्हणजे, आजीचा जीव घेतल्यावर हा नराधम (Pune Crime News) नातू स्वतः सांगवी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजताच्या सुमारास (Pune Crime News) नवी सांगवी येथील क्रांती चौकात घडली. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. (Pune Crime News)
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव मंगल बाबुराव शिंगोरे (वय ६० वर्षे, रा. क्रांती चौक, नवी सांगवी) असे आहे. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून खून करणारा त्यांचा सावत्र नातू ओंकार किसन शिंगोरे (वय २६ वर्षे) हा पिंपळे गुरव परिसरात राहत होता. मंगल शिंगोरे यांच्या सावत्र मुलाचा हा मुलगा आहे. मंगल यांनी त्यांच्या संपत्ती आणि मिळकतीमधील हिस्सा ओंकार याला देण्यास स्पष्ट नकार दिला होता, ज्याचा तीव्र राग त्याच्या मनात होता. याच वादातून शुक्रवारी सकाळी ओंकार नवी सांगवी येथील मंगल यांच्या घरी पोहोचला. तिथे वाद टोकाला गेल्यानंतर त्याने प्रॉपर्टीच्या रागातून आजीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे मंगल शिंगोरे यांचा जागीच मृत्यू झाला.(Pune Crime News)
आजीची हत्या केल्यानंतर आरोपी ओंकारने पळून जाण्याचा (Pune Crime News) प्रयत्न न करता थेट सांगवी पोलीस ठाण्याची वाट धरली. तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलीस अधिकाऱ्यांना आपणच आजीचा खून केल्याची माहिती दिली. हे सर्व ऐकून पोलीसही चक्रावले आणि तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मृत मंगल शिंगोरे यांच्या ३८ वर्षीय मुलीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.(Pune Crime News)
