पुणे: जुन्या मैत्रिणीला फोन करण्याच्या वादातून दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणाचे (Pune Crime News) रूपांतर भयंकर घटनेत झालं. मित्रानेच मित्रावर थेट कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केलं. ही घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कात्रज परिसरात घडली. या घटनेचा सीसीटीव्ही (Pune Crime News) समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील जखमी तरुणाचे नाव चेतन चव्हाण असून, हल्ला करणाऱ्या आरोपी आदित्य कांबळे याला अटक करण्यात आली आहे. आदित्य आणि चेतन हे दोघेही चांगले मित्र होते. दोघे ही २ तारखेला भेटले, जुन्या मैत्रिणीचा (Pune Crime News) विषय निघाला. त्या मैत्रिणीला फोन लावायचा की नाही, यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि तुझ्यामुळे ब्रेकअप झाला असं एक मित्र म्हणाला आणि त्याने थेट बाजूला असलेल्या रसवंती गृहात ठेवलेल्या कोयत्याने मित्रावर वार केले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. (Pune Crime News)

Continues below advertisement

पोलिसांनी दिली प्रकरणाची माहिती

विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या त्रिमूर्ती चौक या ठिकाणी दोन मित्रांमध्ये भांडण झाले, त्या भांडणामध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्रावर रसवंतीगृह येथे असलेल्या धारदार शस्त्राने वार केला, त्यामध्ये एकजण हा जखमी झालेला आहे, जखमीची फिर्यादी घेतली आहे तसेच त्याचा मित्र होता, आरोपीला अटक केलेले आहे. विषय असा होता की दोघांची कॉमन मैत्रीण होती, आपलं ब्रेकअप आहे ते दुसऱ्या मित्राने केलेला आहे,असा संशय त्याला आलेला होता. त्यातून वादावादी झाली. गेल्या तीन ते चार वर्षापासून ते दोघे मित्र होते. जवळजवळ त्याच कॅम्पसमध्ये ते शिकत होते, पहिल्यांदा ते एकमेकांशी बोलत होते, त्यानंतर दुसरे मित्राने जेव्हा मैत्रिणीला फोन लावला तेव्हा तो का लावला? याच्यात दोघांची वादावादी झाली आणि त्या ठिकाणी परिसरातच असलेल्या रसवंतीगृहावरून शस्त्र उचललं आणि मारहाण करायला चालू झाली, यांच्यावरती आधी कोणतेही गुन्हा दाखल झालेले नाहीयेत, ते कॉलेजमध्ये शिकणारे आहेत, आरोपीवर आपण गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे, त्याला अटक केलेले आहे.(Pune Crime News)

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सुनील कांबळे (वय २१) आणि चेतन बाजीराव चव्हाण (वय २३) हे दोघे घनिष्ठ मित्र होते. सोमवारी, २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ते धनकवडीतील त्रिमूर्ती चौक परिसरात एका उसाच्या रसवंतीजवळ थांबले होते. गप्पांच्या ओघात त्यांच्या एका जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. त्या मैत्रिणीला फोन करण्यावरून दोघांमध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला; मात्र काही क्षणांतच हा वाद टोकाला गेला. रागाच्या भरात चेतन चव्हाण याने रसवंतीवर ठेवलेला लोखंडी कोयता उचलून आदित्यवर प्राणघातक हल्ला केला.

Continues below advertisement

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, त्यात संपूर्ण प्रकार कैद झाल्याचे दिसते. फुटेजमध्ये चेतन आदित्यचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने वार करताना स्पष्ट दिसतो. लाकूड तोडताना जसे जोरदार घाव घातले जातात, तशाच पद्धतीने वार केल्याचे दृश्य धक्कादायक आहे. जीव वाचवण्यासाठी आदित्य आरोपीच्या पायाशी पडून गयावया करताना दिसतो. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती; मात्र कोणीही पुढे येऊन मध्यस्थी केल्याचे दिसून येत नाही.

अतिदक्षता विभागात उपचार सुरू

या हल्ल्यात आदित्य कांबळे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यावर व हातांवर खोल जखमा झाल्या असून, तातडीने त्याला भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यच्या डोक्यावर ३० पेक्षा अधिक टाके घालावे लागले असून, सध्या तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चेतन चव्हाण याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११८(२) तसेच अन्य संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) हे कलम का लावण्यात आले नाही, असा सवाल जखमी आदित्यच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी केवळ इच्छापूर्वक गंभीर दुखापत या कलमाखालीच गुन्हा नोंदवल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.