पुणे: पुण्यातील माजी नगरसेविकेच्या मुलाकडून एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भपात करायला लावल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भवती राहिल्यानंतर तिला धमकावून तिची संमती नसताना जबरदस्तीने गर्भपात करायल लावल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुण हा माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर तिने गर्भवती असताना तक्रार देऊ नये यासाठी तरूणीला घेऊन जाऊन आळंदीत लग्न केलं, त्यानंतर संमती नसताना 2 वेळा गर्भपात देखील केला. त्यानंतर वारंवार मारहाण करत राहिला, धमकावत राहिला. 2021 पासून सुरू असलेला हा अत्याचार आत्तापर्यंत सुरू होता, अशी माहिती आहे. 

तरूणाची आई माजी नगरसेविका 

संबंधित तरुण हा माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती आहे. याबाबत पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि पीडित तरुणीची 2021 साली एका जीममध्ये ओळख झाली होती. पीडित तरुणी व्यवसाय करते. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. त्यानंतर आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जायचा. हळूहळू पिडित तरूणीने आरोपीकडे लग्नाची  विचारणा केली, त्यावेळी त्याने टाळाटाळ करायला सुरूवात केली. आरोपीचे अन्य मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तरुणीला होता. याबाबत तिने विचारणा केली असता त्याने तिला शिवीगाळ करून धमकावलं. तिला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले, असे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात 

पीडित तरूणी आणि आरोपी यांची 2021 मध्ये एका जिममध्ये ओळख झाली होती. पीडित तरूणीचा व्यवसाय असून दोघांची दिवसेंदिवस मैत्री वाढत गेली. त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. त्यानंतर आरोपी तरुणीला घरी भेटण्यासाठी जात होता. काही दिवसांनी पीडितेने त्याला विवाहाबद्दल विचारणा केल्यावर तो टाळाटाळ करू लागला. यादरम्यान त्याने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यातून तरूणीला तीन वेळा गर्भधारणा झाली होती. यामध्ये फिर्यादीची संमती नसताना 2 वेळा त्याने जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात केला. आता पुन्हा गरोदर असताना तिने तक्रार देऊ नये म्हणून घरच्यांना न सांगता फिर्यादीशी आळंदी येथे लग्न केले. परंतु नांदायला न नेता, तिचा गर्भपात करण्यासाठी तिला वारंवार मारहाण करत आहे, म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नेमकं प्रकरण काय आहे?

माजी नगरसेविकेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने प्रेमाच्या तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करुन धमकावलं आणि गरोदर राहिल्यावर गर्भपात देखील केला आहे. २८ वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे आणि त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, 2021मध्ये दोघांची जिम मध्ये ओळख झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि लग्नाच अमिष दाखवून त्याने तरुणीवर बलात्कार केला. 17 डिसेंबर 2022  ला तरुणाने तरुणीशी मोबाईलवर संपर्क बोलून मला शेवटचे भेटायचे आहे. न भेटल्यास कुटुंबीयांना संपवून टाकण्याची धमकी त्याने दिली होती नंतर तरुणीने थेट याबद्दल तरुणीने थेट माजी नगरसेविकेला सांगितले. तेव्हा तिला पुन्हा धमकावलं त्यानंतर आरोपीने पीडितेला भेटून लग्न करतो म्हणून सांगितलं आणि बलात्कार करत राहिला. या दरम्यान तरुणी गर्भवती राहिली आणि हे माहीत झाल्यावर तरुणाने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचं तरुणीने तक्रारीत म्हंटलं आहे.