एक्स्प्लोर

Pune Crime News: जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जनस्थळी नेलं; अमानुषपणे मारहाण अन् सामुहिक अत्याचाराचा संशय, नंतर दगडाच्या खाणीत..., घटनेनं पुणे हादरलं

Pune Crime News: अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. सदर प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.

पुणे: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टोशनच्या हद्दीत एका महिलेचा दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने रिक्षामध्ये (Pune Crime News) बसवून निर्जन ठिकाणी नेले. तेथे तिच्यावर काठीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर एका आरोपीने तिला दगडाच्या खाणीत वरून ढकलून दिल्याचा आरोप आहे. तसेच, मयत महिलेवर सामूहिक बलात्कार (Pune Crime News) झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्याबाबत पोलिसांकडून (Pune Crime News) पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्हीमध्ये ओळख पटू नये यासाठी आरोपींनी रिक्षाचे हूड बदलल्याची बाबही तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी संयुक्तपणे केला. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. सदर प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.(Pune Crime News)

महिलेला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जन भागात नेलं अन्...

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत एका महिलेचा दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जन भागात नेले. तेथे तिला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर एका आरोपीने तिला दगडाच्या खाणीत उंचावरून खाली ढकलून दिल्याचं समोर आलं आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.(Pune Crime News)

महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संशय

या प्रकरणात महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतर याबाबत अधिकृत माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी वापरलेल्या रिक्षाचे हूड बदलल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे क्राईम ब्रांच (Pune Crime Branch) आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी संयुक्तपणे केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अधिक चौकशी सुरू असून, गुन्ह्यामागील नेमके कारण शोधले जात आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपींविरुद्ध खून, अपहरण तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.(Pune Crime News)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
Pune Crime News: पुणे तिथे काय उणे! मांजर अन् पोपटावरून वाद; शेजारी आपापसात भिडले, प्रकरण गेलं थेट पोलीस स्टेशनमध्ये, नेमकं काय घडलं?
पुणे तिथे काय उणे! मांजर अन् पोपटावरून वाद; शेजारी आपापसात भिडले, प्रकरण गेलं थेट पोलीस स्टेशनमध्ये, नेमकं काय घडलं?
Pune Police: वेलकम सीपी सर!!! रेड कार्पेट, पोलीस बॅंड... पुण्याच्या पोलीस आयुक्तांची तऱ्हाच न्यारी; गुन्हेगारीच्या आढाव्यापेक्षा स्वागताचीच चर्चा!
वेलकम सीपी सर!!! रेड कार्पेट, पोलीस बॅंड... पुण्याच्या पोलीस आयुक्तांची तऱ्हाच न्यारी; गुन्हेगारीच्या आढाव्यापेक्षा स्वागताचीच चर्चा!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Cocktail 2 Poster Out: एक कार,तीन स्टार्स… ‘कॉकटेल 2’ चं पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला, पण 18 मार्चची भानगड काय?
एक कार,तीन स्टार्स… ‘कॉकटेल 2’ चं पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला, पण 18 मार्चची भानगड काय?
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
Embed widget