पुणे: पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये दहावीतील मुलाची हत्या झाली, मित्रानेच खासगी क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच गळा चिरुन तो पसार झाला. पण या दोघांमध्ये तीन महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं, त्याचवेळी पोलिसांना (Pune Crime News)याबाबत कळवलं असतं. तर कदाचित आज ही दुर्दैवी घटना घडली नसती, अशी माहिती डीवायएसपी अमोल मांडवे यांनी दिली आहे. हल्ला करणाऱ्या मुलाने गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केलेत, शिकवणीमध्ये एका बेंचवर बसलेले असताना ही धक्कादायक घटना घडली. आता हल्ला करणाऱ्या मुलाचा शोध सुरु आहे. पालकांनी या घटनेतून बोध घ्यायला हवा आणि स्वतःच्या मुलांसोबत योग्य ते संभाषण ठेवायला हवं. आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत? ते फावल्या वेळेत काय करतात? कुठं बसतात? याची माहिती पालकांनी ठेवावी, असं आवाहन ही पोलिसांनी केलं. गळ्यावरती आणि पोटावरती वार केलेले आहेत. (Pune Crime News)

Continues below advertisement

Police: खासगी क्लासमध्ये शिकवणी सुरू असतानाच चाकू काढला अन्...

आज सकाळच्या सुमारास खासगी कोचिंग क्लासेस हा रक्तरंजित थरार झाला आहे. या क्लासेसमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्याच्या आधीच्या वादातून मित्रावरच चाकूहल्ला केला. शिक्षक शिकवत असताना हा भयंकर प्रकार घडला. या विद्यार्थ्याने चाकूने मित्राचा गळा चिरला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्य झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

एका विद्यार्थ्याने क्लासमध्येच मित्रावर जीवघेणा हल्ला केला आणि तो तिथून फरार झाला. शिक्षक शिकवत असताना अचानक हा मुलगा उठला त्याने सोबत आणलेला चाकू बॅगेतून काढला आणि शेजारीच बसलेल्या दुसऱ्या मित्रावर वार केला. या मुलाने मित्राचा गळा चिरला. या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेला आणि हल्ला करणारा हे दोघेही दहावीचे विद्यार्थी आहेत.

Continues below advertisement

क्लास सुरू असताना ही हल्ल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. क्लासमध्ये विद्यार्थी प्रचंड घाबरले होते. मित्रावर हल्ला करून आरोपी मुलगा दुचाकीवरून पळून गेला. हा हल्ला का करण्यात आला यामागचे कारण अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच राजगुरूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलाची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.