Pune Crime News: ‘तिला परत आणा’; पत्नीला फुस लावून नेल्याचा संशय, तरूणाला मानसिक तणाव असह्य, चार पानांच्या नोटमध्ये वेदना लिहिल्या अन्...
Pune Crime News: कोणालाही बोलण्याची संधी न देता त्याने अचानक इमारतीवरून उडी मारली. अग्निशमन दल मदतीसाठी पुढे येण्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली.

पिंपरी-चिंचवड : पत्नी बेपत्ता झाल्याच्या मानसिक तणावातून एका तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी भोसरीतील धावडे वस्ती परिसरात घडली. या प्रकरणात मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आपल्या तक्राराची गंभीर आरोप केले आहेत. या घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे.(Pune Crime News)
पत्नीशी फोनवर बातचीत करून देण्यात आली
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव केशरी प्रसाद साहू (रा. भोसरी, पुणे; मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे आहे. गुरुवारी दुपारी केशरी साहू धावडे वस्तीतील एका इमारतीवर चढला होता. तो उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी केशरी साहू याला खाली उतरवण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न (Pune Crime News) केला. यावेळी केशरी साहूने पत्नीशी बोलण्याची मागणी केली. त्यानुसार त्याची पत्नीशी फोनवर बातचीत करून देण्यात आली. मात्र काही क्षणांतच, कोणालाही बोलण्याची संधी न देता त्याने अचानक इमारतीवरून उडी मारली. अग्निशमन दल मदतीसाठी पुढे येण्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली.(Pune Crime News)
कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय
केशरी साहू याची चार पानी सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीत त्याने पत्नी बेपत्ता झाल्याचा उल्लेख करत, तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच, या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करूनही संशयितांची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज तपासणे आणि पत्नीचा शोध घेण्याबाबत पुरेशी मदत मिळाली नाही, असा आरोप त्याने केला आहे.(Pune Crime News)
माझी पत्नी दुसरीकडे राहू शकत नाही
सुसाईड नोटमध्ये केशरीने भावनिक शब्दांत लिहिले आहे की, “माझी पत्नी दुसरीकडे राहू शकत नाही. तिला माझ्याकडे परत आणा. ती नक्की परत येईल. पत्नी माझ्यासोबत नसेल, तर मी केवळ माझ्या मुलीसाठी जगत होतो. माझ्या मृत्यूनंतर मला पुरू नका; अंत्यसंस्कार करायचे असतील, तर ते माझ्या मुलीच्या हातूनच करा. माझी पत्नी जिथे असेल, तिथे ती फार काळ राहणार नाही. तिला आमच्या गावात पाठवा.”
पत्नीला फुस लावून नेल्याचा संशय, तरूणाला मानसिक तणाव असह्य, चार पानांमध्ये आपल्या शेवटच्या नोटमध्ये लिहल्या वेदना अन् इमारतीवरून मारली उडी#Punenews #Crimenews #punecrimenews #police #Video pic.twitter.com/bqhu3YWuHe
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) February 6, 2026
तिचा शोध घेतला असता तिने परत येण्यास नकार दिला होता
दरम्यान, एका वृत्तसंस्थेने पोलिस सूत्रांच्या हवाल्यानुसार दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पत्नी स्वेच्छेने दुसऱ्या व्यक्तीसोबत गेली होती, आणि पोलिसांनी तिचा शोध घेतला असता तिने परत येण्यास नकार दिला होता. मात्र याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.या घटनेबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी द फ्री प्रेस जर्नलच्या प्रतिनिधींनी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे आणि एमआयडीसी भोसरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही उपलब्ध होऊ शकले नाहीत. मृत तरुणाने पोलिसांवर केलेल्या आरोपांबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पत्नीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयातून आत्महत्या
पत्नी बेपत्ता असून तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याबाबत तरुणाने सुसाइड नोटमधून संशय व्यक्त केला आहे. केशरी प्रसाद साहू (रा. भोसरी, पुणे. मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी साहू हा एका इमारतीवर चढला. याबाबत माहिती मिळताच पोलिस आणि महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या पत्नीसोबत बोलण्याची मागणी केली. त्यानुसार त्याचे त्याच्या पत्नीसोबत बोलणे करून दिले. त्यानंतर त्याने इमारतीवरून उडी मारली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
.
























