Bandu Andekar: नातवाच्या खून प्रकरणात सहभागी असलेला बंडू आंदेकरकरचा आणखी एक कारनामा समोर; बिल्डरची फसवणूक करून फ्लॅट विकले अन् पैसेही खाल्ले
Bandu Andekar: बनावट दस्तप्रकरण, उत्तमनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे: नातवाच्या खून प्रकरणात सहभागी असलेला आणि कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणारा सूर्यकांत राणोजी आंदेकर उर्फ बंडू आंदेकर (Bandu Andekar) याच्यासह उत्तमनगरमधील आणखी तिघांविरोधात बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणुकीची घटना सन २००९ ते २०२४ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.(Bandu Andekar)
Bandu Andekar: उत्तमनगरमधील तिघांवर बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक
या प्रकरणी कुख्यात गुंड सुर्यकांत आंदेकरसह (Bandu Andekar) तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बनावट दस्तप्रकरण, उत्तमनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तमनगरमधील तिघांवर बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००९ पासून २०२४ पर्यंत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात महेश रामचंद्र तिखे, सुर्यकांत राणोजी आंदेकर, अविनाश रामचंद्र पवार यांचा भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. (Bandu Andekar)
Bandu Andekar: तक्रारदार यांची संमती न घेता त्या फ्लॅटची विक्रीकरून पैशांचा अपहार
तक्रारदार हे कोंढवे धावडे भागातील रहिवासी आहेत. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची येथे ५५ आर क्षेत्र जागा होती. ती त्यांनी आरोपींना विश्वासाने कुटूंबियांना बांधकाम करण्यास दिली होती. बांधकाम झाल्यानंतर मात्र, त्यांनी तक्रारदार यांची संमती न घेता त्या फ्लॅटची विक्रीकरून पैशांचा अपहार केला. तसेच बनावट खरेदी दस्त तयार केला. त्याचा वापरकरून बेकायदेशीररित्या कर्ज घेतले. तर त्यांच्या जागेचा बेकायदेशीररित्या ताबा घेतला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Bandu Andekar: बनावट दस्तप्रकरणी उत्तमनगर पोलिसांत गुन्हा दाखल
बांधकाम झाल्यानंतर मात्र, त्यांनी तक्रारदार यांची संमती न घेता त्या फ्लॅटची विक्री करून पैशांचा अपहार केला. तसेच बनावट खरेदी दस्त तयार केला. त्याचा वापर करून बेकायदा कर्ज घेतले, तर त्यांच्या जागेचा बेकायदा ताबा घेतला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.























