एक्स्प्लोर

Pune Crime News: तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न; विनयभंग करणार्‍या ज्योतिषाला अटक, पुण्यातील घटनेनं संताप

Pune Crime News: पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणार्‍या एका भोंदू ज्योतिषाने हे कृत्य केलं आहे, पुण्यातील धनकवडी भागात ही संतापजनक घटना घडली आहे.

पुणे: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर भोंदू बाबांचे कारनामे समोर येत आहेत. अशातच पुण्यात आणखी एका बाबाचं संतापजनक कृत्य समोर आलं असून पोलिसांनी त्या बाबावरती तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न, विनयभंग करणार्‍या ज्योतिषाला अटक करण्यात आली आहे. तरुणीला एकांतात बोलावून मंत्र देण्याच्या ऐवजी विनयभंग करण्याचा प्रयत्न या बाबाने केला आहे. पुण्यातील संतापजनक घटनेनंतर ज्योतिषाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणार्‍या एका भोंदू ज्योतिषाने हे कृत्य केलं आहे, पुण्यातील धनकवडी भागात ही संतापजनक घटना घडली आहे.

तुमच्या भावाला एक वनस्पती द्यायची...

मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश लक्ष्मण राजगुरु असे अटक केलेल्या या ज्योतिषाचे नाव आहे. याबाबत एका 25 वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मैत्रिणीने या ज्योतिषी पत्रिका पाहून भविष्य सांगतो, त्याच्याकडे जाऊन ये, असे सांगितले होते. फिर्यादी यांनी त्यांच्या भावाची पत्रिका या ज्योतिषाकडे 12 जुलै 2025 रोजी घेऊन पोहचल्या. पत्रिका पाहिल्यानंतर ज्योतिषाने "तुमच्या भावाला एक वनस्पती द्यायची ती मागवून घेतल्यावर तुम्ही या," असं सांगितलं होतं.

डोक्यावर वस्तू ठेऊन मंत्र म्हणावे लागतील...

18 जुलै रोजी ज्योतिषाने फिर्यादी यांना वनस्पती घ्यायला उद्या या, असं सांगितलं. 19 जुलै रोजी जेव्हा फिर्यादी त्यांच्या धनकवडी येथील कार्यालयात गेल्या तेव्हा ज्योतिषाने "आणलेला वनस्पती तुमच्या डोक्यावर वस्तू ठेऊन मंत्र म्हणावे लागतील" असं सांगितलं. फिर्यादी यांना संशय आल्याने त्या ठिकाणाहून निघाल्या. दरम्यान, अचानक अखिलेश राजगुरु या भोंदु ज्योतिषाने त्यांना मिठी मारली व त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी याबाबतची माहिती भावाला फोन करुन कळवली आणि पोलिसात तक्रार दिली. तक्रार देताच सहकारनगर पोलिसांनी त्याच्या कार्यालयावर छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणाची माहिती देताना सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या कार्यालयावर छापा टाकला. त्याला अटक केली आहे. त्याच्या कार्यालयाची पाहणी केल्यावर त्याने आणखी काहीबाबत असे कृत्य केली असण्याची शक्यता वाटते. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अनेक तक्रारी पुढे येण्याची शक्यता

अखिलेश लक्ष्मण राजगुरु  (वय 45, रा. श्री स्वामी समर्थ ज्योतिष ऑफिस, राजधानी अपार्टमेंट, शंकर महाराज मठाजवळ, सातारा रोड, धनकवडी) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचं नाव आहे. त्या ज्योतिषाविषयी अशा प्रकारच्या अनेक तक्रारी असण्याची शक्यता आहे. मात्र, कोणी बदनामीपोटी पुढे येत नसल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget