एक्स्प्लोर

Pune Crime News: मागून येऊन तोंड दाबलं, गळा दाबत मागे नेऊन लैंगिक अत्याचार केला अन्..., पोलिसांकडून चाकण अत्याचाराबाबत नवी अपडेट

Pune Crime News: आरोपीचे नाव प्रकाश भांगरे आहे, मुळचा तो आहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहे. त्या दोघांचा यापूर्वीचा कोणताही परिचय नव्हता. दोघे एकमेकांना ओळखत नव्हते, दोघांच्या कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत.

पुणे: पुण्यातील चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या तरूणीला जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 13 मेच्या रात्री 11 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नराधम आरोपी प्रकाश भांगरेला चोवीस तासांत बेड्या ठोकण्यात आल्या आहे. 27 वर्षीय महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती. एका कंपनीत ही पीडित हेल्पर म्हणून काम करायची. मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहचली. त्याचवेळी नराधमाने तिला जबरदस्तीने एका इमारतीच्या मागील बाजूस ओढून नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने प्रतिकार केला, आरोपीला चावा ही घेतला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषाच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसांना याबाबत कळवलं. महिलेवर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून नराधम प्रकाश भांगरेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात चाकण पोलिसांना यश आलं. तो सध्या मेदनकरवाडीमध्ये राहायला आहे, मात्र तो मूळचा आहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने याआधी असे काही कृत्य केलंय का? याचा तपास ही केला जातोय.

दोघांचा यापूर्वीचा कोणताही परिचय नव्हता

अत्याचाराच्या घटनेबाबात पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त, शिवाजी पवार यांनी माहिती देताना सांगितलं की, "ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तरूणी रात्रपाळीसाठी कामावर जात होती. एका पॉईंट पर्यत त्यांना पायी जावं लागतं, त्या ठिकाणी पिक अप पॉईंटपर्यंत जात असताना आरोपीने पाठलाग केला, एका ठिकाणी त्याने मागून येऊन तोंड दाबलं, त्यानंतर गळा दाबत तिला एका कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला. यादरम्यान त्या रस्त्यावर दोघे जण जात होते, त्यानंतर त्या तरूणीने त्यांना पाहून मोठ्याने आरडाओरडा केला, त्यानंतर तो आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर एका कपलने त्या तरूणीची मदत केली, पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. 

दोघे एकमेकांना ओळखत नव्हते

चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पिडीत तरूणीला तातडीने उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केलं. आरोपीचे नाव प्रकाश भांगरे आहे, मुळचा तो आहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहे. त्या दोघांचा यापूर्वीचा कोणताही परिचय नव्हता. दोघे एकमेकांना ओळखत नव्हते, दोघांच्या कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत. ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला, सर्व पथकांनी 18 ते 19 तास तपास करून तांत्रिक बाबीचा आधार घेत आरोपीचा शोध घेतला, अटकेपासून वाचण्यासाठी तो लपून बसलेला होता, मात्र, स्थानिक माहितीच्या आणि तांत्रिक बाबींच्या आधारे त्याला अटक घेण्यात यश आलं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Mohammed Siraj: टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल

व्हिडीओ

Suniel Shetty Majha Maha Katta : मराठी सक्ती ते फिटनेस फंडा; सुनील शेट्टीचा माझा महा कट्टा
Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Mohammed Siraj: टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
Shiv Sena UBT on Jain Muni: जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
Goa Fire News: स्फोट अन् सर्वत्र मृतदेहांचा खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश, गोव्यातील नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव... पर्यटक, कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू
स्फोट अन् सर्वत्र मृतदेहांचा खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश, गोव्यातील नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव... पर्यटक, कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू
Virat Kohli : 2-3 वर्षांत असा खेळलोच नव्हतो..., स्वतःला पुन्हा सिद्ध करत विराट कोहलीने टीकाकारांना दिलं उत्तर, जिंकला प्लेयर ऑफ द सिरीज
2-3 वर्षांत असा खेळलोच नव्हतो..., स्वतःला पुन्हा सिद्ध करत विराट कोहलीने टीकाकारांना दिलं उत्तर, जिंकला प्लेयर ऑफ द सिरीज
Embed widget