पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाती मृत्यूचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. अशातच या प्रकरणी एफआयआर दाखल करावेत या मागणीसाठी रोहित पवार (Rohit Pawar) मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यासह बारामती पोलिस ठाण्यातही धाव घेतली. आता या प्रकरणी सीआयडीने देखील माहिती देताना काही महत्त्वाच्या गोष्टी माध्यमांसमोर मांडल्या आहेत. सीआयडीचे (CID) अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद अजित पवारांच्या (Ajit Pawar) अपघाती मृत्यूनंतर सुरू करण्यात आलेल्या तपासाबाबत म्हटलंय की, बारामतीतील २८ जानेवारीच्या विमानाच्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन अजित पवार आणि इतर व्यक्तींच्या अकस्मात मृत्यूचा तपास १९४ अंतर्गत सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे. या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का? हा देखील तपासाचा भाग आहे. दुसरा भाग म्हणजे क्रिमिनल निग्लीजन्स आहे का? याचा देखील तपास होतो आहे. तिसरा भाग म्हणजे हा गुन्हेगारी कट आहे का या अंगाने देखील तपास होतो आहे. 

Continues below advertisement

सर्व तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व निष्कर्ष निघतील

अनेक संस्था या तपासात सहभागी आहेत. या संस्थांचा अहवाल देखील सीआयडीच्या तपासात समाविष्ट करण्यात येणार आहे. या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्यासाठी देखील पत्र देण्यात आलं आहे. तपास योग्य दिशेने चालला आहे, अशी माहिती सीआयडी कडून देण्यात आली आहे. तर VSR कंपनीवर DGCA कडून कारवाई झालीय, तुमच्या तपासात या कंपनीकडून हलगर्जीपणा आढळून आलाय का? या प्रश्नावरती उत्तर देताना सीआयडीकडून सांगण्यात आलं की, तांत्रिक तपास हा वेगळा भाग आहे आणि आमचा CID चा तपास हा आकस्मिक मृत्यू बद्दल आहे. आमच्या तपासात काही पुरावे मिळाले आहेत. AAIB चा अहवाल आला की तो आमच्या तपासात समाविष्ट केला जाईल, सर्व तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व निष्कर्ष निघतील, सर्व माहिती समोर येईल असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. 

या घटनेमागे तपासाचा उद्देश म्हणजे हा घातपात आहे का? याचा तपास करणे. त्याचबरोबर यामध्येक्रिमिनल निग्लीजन्स आहे का? हे सुद्धा तपासणे हा देखील एक तपासाचा भाग आहे तिसरा आणि महत्त्वाचा भाग आहे यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का?, काही गुन्हेगारी घडली आहे का? हा या तपासाचा स्कोप आहे, या तीन गोष्टी, याबाबत हा तपास सुरू आहे. या आकस्मिक मृत्यूचा तपास योग्य प्रकारे पहिल्या क्षणापासून अतिशय प्रोफेशनलपणे सुरू आहे. यामध्ये आपल्याला बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय फॉरेन्सिक विभाग त्याचबरोबर पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅब एविएशन ऑथॉरिटी आणि इतर एजन्सी तसेच आपल्या केंद्रातील अन्य संस्था आपल्या तपासामध्ये सहकार्य करत आहेत. त्याचबरोबर AAIB त्यांच्याशी देखील सीआयडीचा सातत्याने समन्वय सुरू आहे आणि त्यांचा तपास संपल्यानंतर त्याचा अहवाल आपण अकस्मिक मृत्यूच्या तपासामध्ये त्याचा निष्कर्ष सुद्धा लक्षात घेणार आहे. तसेच सदर घटना त्याचे गंभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सुद्धा या आकस्मिक मृत्यूचा तपास सीबीआय कडे वर्ग करण्यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे. थोडक्यात या तपासामध्ये घातपात कट वगैरे किंवा कोणते प्रकारचे गुन्हेगारी कृत्य इत्यादी असे पण निष्पन्न झाल्यास यंत्रणा सीआयडी योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयमध्ये अभियोग चालवण्याची त्यांनी तयारी ठेवली आहे. 

Continues below advertisement

तपास अतिशय योग्य दिशेने चाललेला आहे. तपासामध्ये अनेक प्रकारचे एजन्सी मदत करत आहेत, काही एक्स्पर्ट ओपिनियन घ्यायला लागणार आहेत. रिपोर्ट देखील पाहण्यात येत आहेत. अतिशय वेगाने आणि अतिशय प्रोफेशनल पणे तपास सुरू आहे. आपली टीम मोठी आहे. पुणे आणि मुंबई सीआयडी अधिकारी तपास करत आहेत. योग्य त्या वेगाने योग्य त्या सुपरव्हिजन खाली घटनेचा तपास करत आहेत. AAIB चा इन्वेस्टीगेशनचा जो स्कोप आहे आणि सीआयडीचा आकस्मिक मृत्यू तपास करण्याचा जो स्कोप आहे, त्यामध्ये थोडी भिन्नता हे मात्र AAIB त्यांचा तपास करून रिपोर्ट जनरेट करेल, तो रिपोर्ट सीआयडीच्या आकस्मिक मृत्यूच्या तपासामध्ये घेतला जाईल. 

सुप्रीम कोर्टाने सांगितला आहे की, तपासामध्ये टाईम लाईन नसतात, या प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे. यामध्ये अनेक एजन्सी समाविष्ट आहेत. या सगळ्या माहितीची तपासणी करावी लागेल. मात्र मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. या प्रकरणाचा तपास योग्य वेगाने आणि योग्य दिशेने चालू आहे. अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अनेक पुरावे समोर आले आहेत. जसे जसे सर्व पुढे अनेक पुरावे येथील अनेक निष्कर्ष निघतील. तेव्हा सर्व सांगण्यात येतील, आम्ही भरपूर पुरावे गोळा केलेले आहेत, उर्वरित पुरावे आहेत, ते लवकर गोळा केले जातील, टेक्निकल रिपोर्ट्स आहेत ते देखील मिळवण्यात येतील त्यानंतर निष्कर्ष काढण्यात येईल, असंही सीआयडीकडून सांगण्यात आलं आहे.