पुणे: पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली वरमुखवाडी परिसरात व्यावसायिक नितीन गिलबिले यांचावर गोळीबार (Pune Crime News) करून खून करणाऱ्या टोळीमधील तिघांना यासाठी पोलिसांनी अटक केली, आता या प्रकरणात माजी नगरसेवक किसन तापकीर याचे नाव समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार अटकेतील आरोपींनी माजी नगरसेवक किसन तापकीर यांचं नाव घेतल्याचं पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे, अद्याप तापकीर सापडले नसून दिघी पोलिस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत आहेत, जमिनीच्या व्यवहारातून हा खून (Pune Crime News) झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणात आतापर्यंत आरोपी अमित पठारे, विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल या तिघांना अटक केली होती तर तापकीर यांचा शोध सध्या सुरू आहे.(Pune Crime News)

Continues below advertisement

नितीन शंकर गिलबिले (वय ३७, रा. वडमुखवाडी) असे खून झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी अमित जीवन पठारे (वय ३५, रा. पठारेमळा, चऱ्होली), विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोळू, ता. खेड) आणि सुमीत फुलचंद पटेल (वय ३१, रा. गायकवाडनगर, दिघी) या तिघांना अटक केली आहे.(Pune Crime News)

Pune Crime News:  काय आहे प्रकरण?

नितीन शंकर गिलबिले खून प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर (बुधवारी) रोजी सायंकाळी अलंकापुरम रस्त्यावर गिलबिले आणि त्यांच्या ओळखीतील काही लोक थांबलेले असताना अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे फॉर्च्युनर कारमधून तेथे आले. त्यांनी नितीन गिलबिलेला कारमध्ये बसवून त्यांच्या डोक्यात जवळून गोळी झाडली. गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह खाली ओढून टाकला आणि आरोपी मित्र असलेले घटनेनंतर कार घेऊन पसार झाले. 

Continues below advertisement

दरम्यान, आरोपी ताम्हिणी घाट परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या भागात शोधमोहीम राबवताना विनाक्रमांकाची एक मोटार संशयित अवस्थेत दिसली. पोलिसांनी पाठलाग करून मोटार ताब्यात घेतली आणि विक्रांत ठाकूर व सुमीत पटेल यांना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार व मोबाइल जप्त करण्यात आले. मुख्य आरोपी अमित पठारे याला दिघी पोलिसांनी वाघोली येथून अटक केली. सुमीत पटेल हा गोळीबाराच्या आधी व नंतरही आरोपींसोबत फिरत होता, त्यामुळे त्याचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.

खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र, तपासादरम्यान तापकीर यांचे नाव आरोपींकडून समोर येत असल्याने तपासाची दिशा बदलली आहे. गुन्ह्यातील अचूक कारण, संबंध, आर्थिक किंवा वैयक्तिक वाद; तसेच तापकीर यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध याबाबत पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू आहे. तापकीर यांचा शोध सुरू करण्यात आला असून, दिघी पोलिसांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र पथक तयार केल्याचे सांगण्यात येत आहे.