Pune Accident: पिंपरी चिंचवडच्या भोसरीतील पुलावर एका टेम्पोचा अपघात झाला अन त्यातील लोखंडी जॉब पुलाखाली आले. काही कळण्याआधी पुलाखालून निघालेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावर हे लोखंडी जॉब पडले. या अपघातात हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना सीसीटीव्हीत कैद झाली. धक्कादायक बाब म्हणजे या अपघाताला 24 तास उलटले तरी भोसरी पोलिस अनभिज्ञ आहेत. दुचाकीस्वाराचा जीव धोक्यात असताना पोलिसांकडे या अपघाताची माहीत उपलब्ध नाही. त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जातायेत.

Continues below advertisement

नेमकं घडलं काय? 

पिंपरी चिंचवड भोसरीतील पुलावर घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक म्हणजे, या घटनेला 24 तास उलटूनही भोसरी पोलिसांना या अपघाताची माहितीच नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरीतील पुलावर एका टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात टेम्पोतील लोखंडी जॉब खाली कोसळले. त्याच वेळी पुलाखालून दुचाकीस्वार जात असताना हे जॉब त्याच्या अंगावर पडले. अचानक झालेल्या या प्रकारात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Continues below advertisement

वरून लोखंडी जॉब पडले अन्... 

ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की, टेम्पोचा तोल जाऊन लोखंडी जॉब रस्त्यावर पडतात आणि त्याच वेळी दुचाकीस्वाराच्या अंगावर आदळतात. अपघात इतका अचानक झाला की, दुचाकीस्वाराला टाळण्याची संधीच मिळाली नाही. 

24 तास उलटूनही पोलीस अनभिज्ञ

घटनेनंतर 24 तास उलटूनही भोसरी पोलिसांकडे या अपघाताची अधिकृत माहिती पोहोचलेली नाही. त्यामुळे जखमीच्या उपचारांबाबत किंवा अपघाताची नोंद घेण्याबाबतही पोलीस प्रशासन निष्क्रिय असल्याचे चित्र समोर आले आहे.

स्थानिक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला असून, एवढा गंभीर अपघात होऊनही पोलिस अनभिज्ञ राहणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले आहे. अपघाताच्या तपासात विलंब झाल्याने जबाबदार व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दक्षतेबाबत आणि वेगवान प्रतिसादक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.