एक्स्प्लोर

Pune : पुण्यातील आंदोलन भोवलं! दगडफेकीची घटना अन् काँग्रेस आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गुन्हे दाखल

Pune BJP Congress Rada : दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात तक्रार दिल्यानंतर स्थानिक नेत्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतान विषयी करण्यात आलेल्या वक्तव्यानंतर करण्यात आलेलं पुण्यातील आंदोलन आता भाजप आणि काँग्रेसलाही भोवण्याची शक्यता आहे. या आंदोलन प्रकरणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना विरोधात दिलेल्या तक्रारीनंतर दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यासह 100 जणांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजपने दिलेल्या तक्रारीनंतर, काँग्रेसचे अरविंद शिंदे, प्रशांत जगताप यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपने आंदोलन केलं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनेही आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 

Pune BJP Congress Rada : नेमकं काय घडलं? 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर भाजपनं त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस भवन परिसरात आंदोलन केलं.

भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्तेही मैदानात उतरले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी भाजपकडून दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यात काँग्रेसचे काही कार्यकर्ते जखमी झालेत. तर महिला पोलीस कर्मचारीही या राड्यादरम्यान जखमी झाल्याची माहिती आहे. 

या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी आलेल्या पुणे पोलीस आयुक्त आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अखेर काही वेळानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यात पोलिसांना यश आलं. 

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पुण्याच्या पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याबाबत फिर्याद दिली. घाटे यांच्या या फिर्यादीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही बातमी वाचा:

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
Embed widget