पुणे : काही पोलिसांकडून (Police) सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या गुंडगिरीची अनेक उदहारणं सातत्याने पाहायला मिळतात. सदरक्षणाय खलनिग्रहणाय.. म्हणत सज्जनांच्या रक्षणासाठी असणारे पोलीस अधिकारी अनेकदा केवळ बड्या लोकांसाठी आणि नेत्यांसाठीच काम करतात की काय असाही प्रश्न निर्माण होते. आता, पुणे जिल्ह्यातील (Pune) आंबेगाव पठार पोलीस चौकीत आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून बेदम मारहाण केल्याप्रकरणी अखेर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या फॅक्ट फाईंडिंग रिपोर्टनंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 11 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

पुण्यात अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 11 पोलिसांवर FIR नोंदवण्यात आला. आंबेगाव पठार पोलीस चौकीत 20 ते 21 जुलै 2026 रोजी घडलेल्या प्रकाराबद्दल मानवाधिक आयोगाने संताप व्यक्त करत गुन्हा निर्देश करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी, पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे संकेत सतिश गोसावी यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर, मानवी हक्क आयोगाच्या सुमोटो Case. No. 4848/13/23/2026 आणि 4774/13/23/2026 च्या आदेशान्वये कारवाई करण्यात आली आहे. 

नेमकं काय घडलं?

20 जुलै रोजी 4 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी आंबेगाव पठार चौकीत आणलं होतं. तर, 21 जुलै रोजी पुन्हा 4 जणांना ताब्यात घेतलं. त्यामुळे, एकूण 8 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून बेल्टने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथे बालकल्याण पोलीस अधिकारी नसताना, API स्नेहल थोरात यांनी अहवाल लिहिला. त्यानुसार, गु.र.नं. 383/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पण, मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर न करता पोलीस कोठडीत ठेवलं. याप्रकरणातील अल्पवयीन मुले 1, 3, 7 आणि 8  हे अनुसूचित जातीचे असल्याने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप देखील पोलिसांवर करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्याचा ठपका ठेवत अॅट्रॉसिटीचा दाखल झाला आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, एका प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना तीन दिवस डांबून ठेवल्याबद्दल आणि दुसऱ्या एका प्रकरणात अल्पवयीन आरोपींना कारच्या बोनेटला बांधून त्यांना मारहाण केल्याबद्दल पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील 11 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्य मानवाधिकार आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना पुण्याचे पोलीस आयुक्तांसह तेरा पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देत स्थगिती मिळवली. त्यामुळे पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांना वगळुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अकरा पोलीसांवर सी आय डी कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलांना डांबून ठेवणे, त्यांची धिंड काढणे, त्यांना मारहाण करुन ती वैद्यकीय तपासणीत आढळून येऊ नये यासाठी पुरावे दडवण्याचा प्रयत्न करणे आणि एट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अल्पवयीन मुलांना मारहाण, कोणावर गुन्हा?

1) मानसिंग पाटील - वरिष्ठ पोलीस निरीक्षक2) गणेश मोहिते - सपोनि3) स्नेहल थोरात - सपोनि4) निलेश मोकाशी - पोनि5) सुनिल हनवटे - पोहवा6) दिनेश टापके - पोहवा7) मितेश चोरमोले - पोलीस अंमलदार8) सागर बोरसे - पोलीस अंमलदार9) सोहम रोडेकर - पोलीस अंमलदार10) मंगेश पवार - पोलीस अंमलदार11) स्वप्ना भिसे - महिला पोलीस अंमलदार

कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल?

भारतीय न्याय संहितेच्या BNS 2023 - 115(2), 120, 127(2), 127(3), 131, 352, 351(2), 198, 199, 336(2), 337

बाल न्याय कायदा 2015 - कलम 74, 75 - बालकाची ओळख उघड करणे, क्रूर वागणूक

अॅट्रॉसिटी कायदा 1989 - 3(1)(e), (r), (u), (z), 3(2)(vii)

दरम्यान, याप्रकरणी, सुनील रामनंद हे तपास अधिकारी म्हणून काम करत आहेत. 

हेही वाचा

कंपनीतील भींत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल, कामगार सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर